आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदेंना फडणवीस सरकार पाडायचे होते:शिवसेनेने 2014 मध्ये आघाडीसाठी दिला होता प्रस्ताव; चव्हाणांचा दावा, आताच का?

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यामुळे बंड करावे लागले, असे एकनाथ शिंदे म्हणत आहेत. मात्र 2014 मध्ये त्यांच्यासह शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्यासाठी चचापणी केली होती. विशेष म्हणजे असा प्रस्ताव घेऊन एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती, असा दावा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.

चव्हाणांनी तब्बल आठ वर्षांनंतर नेमके राहुल गांधीच्या दौऱ्यापूर्वी हा गौप्यस्फोट करून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, अशोक चव्हाणांच्या वक्तव्याची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाठराखण करत हे करे असल्याचा दावा केला आहे.

का केला असावा दावा?

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तळात सुरू आहेत. तर दुसरीकडे विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्रीपदी एकनिष्ठ व्यक्तीला मिळावे, असे सांगत नारायण राणेंचा पत्ता कट करत त्यावेळी अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदावर बसण्यास मदत केली होती. येत्या नोव्हेंबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सुरू होणार आहे. यावेळीही काँग्रेसची सर्व सूत्र एकनिष्ठ म्हणून आपल्याच हाती रहावी याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांनी 8 वर्षांपूर्वीच्या घटनेकडे लक्ष केंद्रीत करत, आपण भाजपसोबत जाणार या कथित चर्चांना देखील पू्र्णविराम लगावला आहे.

अशोक चव्हाण म्हणाले?

राज्यात भाजप-शिवसेना युतीचे 2014 ते 19 सरकार होते. यावेळी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. या प्रस्ताव घेऊन येणाऱ्यामध्ये एकनाथ शिंदेंचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. तेव्हा मी या शिष्टमंडहाला आधी शरद पवारांशी चर्चा करावी असा सल्ला दिला होता. मात्र, ते शरद पवारांना भेटले नाही, आणि पुढे काय झाले याबद्दल मला माहिती नाही असे चव्हाणांनी स्पष्ट केले.

शिंदेंच्या बंडावर शंका

गेली अनेक दिवस शिंदे गटातील नेते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्याने आम्ही बाहेर पडलो असे म्हणत आहेत. मात्र, शिवसेनेकडून काँग्रेसला युतीचा जो प्रस्ताव दिला त्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे असल्याने त्यांच्या आता शिवसेनेतून बाहेर पडण्यावर राजकीय वर्तळुात शंका निर्माण हाेऊ लागली आहे. तर गुलाबराव पाटील म्हणाले की एकनाथ शिंदे गेले असतील पक्षाने सांगितले की जावे लागते. मात्र अशोक चव्हाणांच्या बोलण्यात तथ्य नाही, सोनिया गांधींनी त्यांना शिवसेनेसोबत जा असे सयांगितले असेल तर तसे जावे लागेल म्हटल्याने राजकीय वर्तळात चर्चांना उधाण आले आहे.

बातम्या आणखी आहेत...