आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनावर मात:सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चव्हाण यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली आहे. आज( दि 4) त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे 25 मे रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चव्हाण यांच्यावर 10 दिवस उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. दरम्यान, अशोक चव्हाण यांना घरी सोडण्यात आले असले, तरीदेखील 14 दिवस होम क्वारेंटाईन राहावे लागणार आहे.

अशोक चव्हाण लॉकडाऊनच्या काळात नांदेडमध्ये होते. परंतू, विधानपरिषद निवडणुकीदरम्यान त्यांचा मुंबई प्रवास झाला. परत आल्यानंतर त्यांनी स्वतःला आयसोलेट केले होते, परंतू चाचणीनंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर चव्हाण यांना नांदेडहून मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

0