आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Aslam Shaikh Studio Scam Mumbai | Aslam Shaikh 1000 Crore Studio Scam | Environment Department Notice To Former Guardian Minister Of Mumbai Aslam Sheikh

मढ मार्वे स्टुडिओत 1000 कोटींचा घोटाळा:माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर किरीट सोमय्यांचा आरोप; पर्यावरण खात्याची नोटीस

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना महाराष्ट्र पर्यावरण मंत्रालयाने नोटीस पाठवली आहे. मढ मार्वेमध्ये 1000 कोटी रुपयांचा स्टुडिओ घोटाळाप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर हे गंभीर आरोप केले असून मुंबई जिल्हाधिकारी आणि पालिकेला कठोर कारवाई करण्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे. मला स्टुडिओ तोडण्याची अपेक्षा असल्याचे देखील सोमय्या यांनी यावेळी ट्विट करत म्हटले आहे.

पर्यारण मंत्रालयाने नोटीस बजावल्यानंतर माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सोमय्या यांनी एक व्हिडिओ जारी करत म्हटले आहे की, मढ मार्वेमध्ये समुद्र किनाऱ्यावर अस्लम शेख यांनी अनधिकृत स्टुडिओ बांधकाम केले असून त्यांची त्यात मोठा घोटाळा केला आहे. राज्याच्या पर्यारण विभागाने त्यांना एक नोटीस बजावली असून, मुंबई पालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करावी असे आदेश दिल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.

सोमय्यांचा आरोप

एक हजार कोटी रुपयांचा दावा असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला असून, त्याच प्रकरणात सोमय्या यांनी तक्रार केल्यानंतर पर्यारण विभागाने अस्लम शेख यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे का, जर केले असेल तर त्यांच्यावर कारवाई करा आणि रिपोर्ट सादर करा असे आदेश दिले आहेत. सोमय्या यांच्या दाव्यानुसार, अस्लम शेख यांनी मढमध्ये सहा महिन्यांसाठी काही स्टुडिओ उभारले होते. त्यादरम्यान त्यांनी खारफुटी करुन तीन स्टुडिओची निर्मिती केली. ते तीन स्टुडिओ बेकायदेशीर असल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे.

नियमांचे उल्लंघन

2019 महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर हे स्टुडिओची निर्मिती करण्यात आली आहे. 2019 ते 21 दरम्यान हे स्टुडिओ तयार करण्यात आले. त्यासाठी मिळालेली परवानगी ही तात्पुरती स्टुडिओ निर्मिती होती. परंतु त्या ठिकाणी तात्पुरते सेट न उभारता अस्लम शेख यांनी मोठे बांधकाम करुन स्टुडिओ उभारले, त्यासाठी त्यांनी CRZ (किनारपट्टी नियमक झोन) च्या नियमांचे उल्लंघन केले. या सगळ्या प्रकरणामध्ये अस्लम शेख यांनी एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

काय कारवाई होणार

सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर हा दावा केल्यानंतर अस्लम शेख यांनी दोनच दिवसांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र, असे असतानाही आता पर्यारण विभागाने अस्लम शेख यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत, त्यामुळे आता त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होते हे पाहावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...