आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुरुवारी सुप्रीम कोर्टाने एका आदेशात म्हटले होते की, सीबीआयला कोणत्याही प्रकारचा तपास करण्यापुर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. आठ राज्यांनी सर्वसाधारण संमती मागे घेतल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. या तरतुदी घटनेच्या संघराज्य वर्णनाला अनुरुप असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
सीबीआय पान दुकान बनले
आता या प्रकरणाबाबत राजकारण सुरू झाले आहे. राज्य सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी यासाठी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शेख म्हणाले, सीबीआय हे भाजप सरकारमधील पान दुकानाप्रमाणे झाले आहे. सीबीआय कोठेही जाऊन कोणाविरुद्धही विशेषत: गैर-भाजपा शासित राज्यांमध्ये गुन्हा नोंदवते.
ते पुढे म्हणाले, 'ही (सीबीआय) मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर कारवाई करते. कोर्टाच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. कोर्टाच्या निर्णयानंतर आता सरकार कोणतीही मनमानी करणार नाही.'
सुप्रीम कोर्टाने निकालात हे देखील म्हटले
सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात हे देखील म्हटले की, दिल्ली विशेष पोलिस स्थापना अधिनियमनुसार वर्णित शक्ती आणि अधिकार क्षेत्रांसाठी सीबीआयला कोणत्याही प्रकरणाच्या तपासापूर्वी संबंधित राज्य सरकारकडून सहमती घेण्याची आवश्यकता आहे.
सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की, 'हे असे दिसून येते की कलम पाच केंद्र सरकारला डीएसपीई सदस्यांचे अधिकार आणि कार्यक्षेत्र राज्य पलीकडे केंद्रशासित प्रदेशापर्यंत वाढवण्यास सक्षम करते.' 'पण, संबंधित राज्य डीएसपीई कायद्याच्या कलम सहा अंतर्गत अशा मुदतवाढीस मान्यता देत नाही तोपर्यंत हे मान्य होणार नाही.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.