आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिस्वा होणार आसामचे नवीन मुख्यमंत्री:हिमंत बिस्वा यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले गेले, सोनोवाल यांनी राज्यपालांना राजीनामा सोपवला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आसाममध्ये भाजप+ ने जिंकले 75 जागा

आसाम विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या एक आठवड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे नाव ठरले आहे. हिमंत बिस्वा सरमा यांना रविवारी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले गेले. या बैठकीला केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह आणि भाजपचे आसाम प्रभारी बैजयंत पांडा हे देखील उपस्थित होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यपाल जगदीश मुखी यांना आपला राजीनामा सोपवला.

आज दुपारी गुवाहाटीमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार झाली. या वेळी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह उपस्थित होते. या बैठकीला भाजपचे आसाम प्रभारी बैजयंत पांडादेखील उपस्थित होते.

शनिवारी दिल्लीत झाला निर्णय
यापूर्वी शनिवारी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी हायप्रोफाइल मीटिंग झाली. यामध्ये सर्बानंद सोनोवाल आणि हिमंत बिस्वा सरमा उपस्थित होते. मीटिंगमध्ये गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे जनरल सेक्रेटरी बीएल संतोष यांच्या उपस्थितीत नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा झाली.

आसाममध्ये भाजप+ ने जिंकले 75 जागा
आसाममध्ये तीन-टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत भाजप आघाडीला 75 जागा मिळाल्या आहेत. हा आकडा बहुमतापेक्षा जास्त आहे. भाजपच्या या विजयाने आसाममध्ये इतिहास रचला आहे, कारण 70 वर्षात सलग दुसर्‍यांदा कॉंग्रेस पक्ष सत्तेत येऊ शकलेला नाही.

हिमंत यांचा एक लाख मतांनी झाला विजय
सोनोवाल यांनी काँग्रेस नेते राजिब लोचन पेगू यांना 43,192 मतांनी हरवून माजुलीमध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. तर हिमंत बिस्वा यांनी काँग्रेसचे रोमेन चंद्र बोरठाकुर यांना 1.01 लाख मतांच्या अंतराने हरवून जालुकबारी सीटवर आपला ताबा कायम ठेवला. सोनोवाल आणि सरमा व्यतिरिक्त भाजपचे 13 इतर मंत्रीही सहज आपली जागा कायम ठेवण्यात यशस्वी राहिले.

बातम्या आणखी आहेत...