आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिष शेलार यांच्या ऋतुजा लटकेंना शुभेच्छा:म्हणाले - ऋतुजाताईंचे अभिनंदन! भाजपाच्या मदतीमुळे अंधेरी पूर्वमध्ये विजय झाला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला आहे. ऋतुजा लटके यांनी 53471 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी ऋतुजा लटके यांचे अभिनंदन केले. तसेच भाजपाच्या मदतीमुळे विजय झाला, आम्ही निवडणूक झाली असती तर पराभव निश्चित होता, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.

आशिष शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, भाजपाच्या मदतीमुळे मा. ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व मध्ये विजय..ऋतुजाताईंचे अभिनंदन!! काँग्रेस,राष्ट्रवादी,भाकप,डझनभर पक्षांनी पाठींबा देऊन ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला ना मतदान जास्त झाले, ना मतं जास्त मिळाली. भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता!

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पक्षानं माघार घेतली होती. अंधेरी पूर्व मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. यानंतर भाजपमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले. अखेर भाजपने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर मात्र, पराभावाची जाणीव झाल्याने भाजपने माघार घेतल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटले होते.

तर उमेदवार दिला नसता
आज विजयानंतर ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या माघारीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी त्यांनी नोटाला पर्याय निवडण्याचे आवाहन केले होते.नोटाला झालेले मतदान हे भाजपलाच मिळालेली मते आहेत. त्यांच्या मनात सहानुभूतीची भावना असती तर त्यांनी आधीच उमेदवार जाहीर केला नसता, अशी टीका त्यांनी केली.

कोणाला दिली होती भाजपने उमेदवारी

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्यात मुकाबला होणार झाला असता. पण, भाजपने माघार घेतली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातून यासंदर्भात घोषणा केली. पुढच्या निवडणुकीला एक वर्ष आहे. यापूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी जर कुणाचं निधन होतं तेव्हा त्यांच्या परिवारीत कोणी लढलं असेल तर भाजप उमेदवार देत नाही, ही आमची संस्कृती आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या काळापासून ही आमची संस्कृती आहे. या निवडणुकीत ऋतुजा लटके या निवडून याव्यात, त्यांच्या समर्थनार्थ आम्ही हा अर्ज मागे घेत आहोत, असे भाजप प्रदेशाध्य म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...