आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा विळखा:विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना कोरोनाची लागण, दोन दिवसांवर आहे पावसाळी अधिवेशन

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणार आहे.

काँग्रेस नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांवर असताना अध्यक्षांना कोरोनाची बाधा झाली. नाना पटोले यांनी स्वत: ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.

'गेल्या काही दिवसांपासून माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे. त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागले. त्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करु नये' असे ट्विट नाना पटोलेंनी केले आहे. तसेच 'माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करुन आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन' असंही ते म्हणाले आहेत.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. दोन दिवसीय अधिवेशनासाठी दोन्ही सभागृहातील आमदारांची अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्या आमदारांना सभागृहात प्रवेश देण्यात येणार नाही.