आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजपासून हिवाळी अधिवेशन:राज्यात अघोषित आणीबाणी : फडणवीस...,मग देशात घोषित आहे का : मुख्यमंत्री

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे सरकारने चहापानाच्या ठेवलेल्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. - Divya Marathi
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे सरकारने चहापानाच्या ठेवलेल्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला.
  • अधिवेशनात गाजणार हे मुद्दे

महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का, असा सवाल करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला सणसणीत उत्तर दिले. तत्पूर्वी, पत्रकार व विरोधक यांच्यावर अघोषित आणीबाणी लादली असून राजकीय नाट्य खेळून समाजा-समाजात तेढ निर्माण केली जात आहे, असा आरोप फडणवीस यांनी भाजपच्या बैठकीत केला होता. अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे सरकारने चहापानाच्या ठेवलेल्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. चहापान कार्यक्रम झाल्यावर मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली. दरम्यान, या अधिवेशनात चर्चेला केवळ सहा तास मिळणार आहेत. त्यात १० विधेयकावर चर्चा शक्य नाही, असा दावा करून महाविकास आघाडी सरकार सभागृहातील चर्चेपासून पळ काढत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

कोरोना अन् वेळेअभावी अधिवेशनाची उरली केवळ औपचारिकता
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून मुंबईत सुरू होत आहे. राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागपूरऐवजी मुंबईत तेही अवघे दोन दिवसांचे अधिवेशन होणार असून यामध्ये सहा अध्यादेश आणि दहा विधेयके मांडली जाणार आहेत, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव, अध्यादेश, प्रस्तावित विधेयके तसेच पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल तसेच विधेयकावर चर्चा होऊन विनियोजन बिल मंजूर करून घेतले जाईल, अशी माहिती परब यांनी दिली. पावसाळी अधिवेशन मुंबईतच पार पडले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या वेळी काही आमदारांची बसण्याची व्यवस्था प्रेक्षक गॅलरीत होती. तसेच विधिमंडळात जाणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी झाली होती. तीच पद्धत हिवाळी अधिवेशनात कायम ठेवली आहे.

अन्नदाता को देशद्रोही कहनेवाले इन्सान नहीं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीत भरथंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत, ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? अन्नदात्याला देशद्रोही ठरवणे आपल्या संस्कृतीत नाही. ‘अन्नदाता को देशद्रोही कहनेवाले इंसान कहने के लायक नहीं है’ असा टोला त्यांनी खास हिंदी भाषेतून लगावला.

आमच्या काळातील योजना बंद करण्याचा सपाटा: फडणवीस
आघाडी सरकारने आमच्या काळात सुरू झालेल्या योजना बंद करण्याचा सपाटा लावला आहे. पत्रकार व विरोधक यांच्यावर अघोषित आणीबाणी लादली आहे. राजकीय नाट्य खेळून समाजा-समाजात तेढ निर्माण केली जात आहे. त्यामुळे सरकारला तोंड दाखवायलाही जागा राहिलेली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.

अधिवेशनात गाजणार हे मुद्दे : मराठा आरक्षणाचा विषय सध्या गाजत आहे. हा मुद्दा विरोधक उपस्थित करणार आहेत. भाजपची कोंडी करण्याकरता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कृषी कायद्याचा मुद्दा तापवण्याची शक्यता आहे. मोफत वीज आणि वाढीव वीज बिलांचा मुद्दाही विरोधकांकडून मांडण्यात येऊ शकतो. महिला व बालकांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी बहुचर्चित ‘शक्ती’ मांडणार आहे. परंतु हे क्रांतिकारी विधेयक चर्चेविना घाईतच मंजूर होण्याची दाट शक्यता आहे.

दोन दिवसांचे अधिवेशन ६ अध्यादेश, १० विधेयके मांडली जाणार
विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावेळी सहकारी मंत्र्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser