आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत विविध निर्णय:राज्यात सध्या मास्कसक्ती नाही, पण कठोर निर्बंध नको असल्यास सर्व सूचनांचे पालन करा- मुख्यमंत्री

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड टास्कफोर्सची बैठक आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीत कठोर निर्बंध नको असेल तर सर्व सूचनांचे पालन करा अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिल्या आहेत. तसेच तुर्तास मास्कसक्ती केली जाणार नाही पण पुढील पंधरा दिवस रुग्णसंख्येचा आढावा घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत आज कोविड टास्कफोर्सची बैठक बोलावली. या बैठकीत कोरोना संदर्भात टास्कफोर्ससोबत चर्चा करण्यात आली. वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि टास्कफोर्स यांच्यात झालेल्या या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

जनतेला आवाहन

बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. राज्यात पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मास्क सक्ती नाही, परंतु घरातून बाहेर पडताना मास्क लावण्याचे लोकांना आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

आगामी दहा दिवस महत्वाचे

पुढील 8 ते 10 दिवस महत्वाचे असणार आहेत. त्यानंतरची आकडेवारी बघून कोविड संदर्भात पुढील निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. जर कडक निर्बंध नको असतील तर नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. शाळा सुरू करण्यासंदर्भात सध्या तरी अडचण नाही. परंतु रूग्णसंख्या वाढल्यास 12 वर्षांखालील मुलांबाबत दक्ष राहावे लागेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

ठळक

  • मास्क सक्तीचा विषय बैठकीत झाला नाही
  • पुढील पंधरा दिवस रुग्णसंख्येचा आढावा घेण्यात येणार.
  • गर्दीत मास्क वापरण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

कोरोना रुग्णसंख्या यामुळे वाढतेय

मागील दोन महिन्यांमध्ये करोना रुग्णसंख्या शंभरपर्यंत होती. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र मंगळवारी शहरात पाचशेहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली. वाढते पर्यटन, इतर देशांमध्ये वाढणारी करोना रुग्णसंख्या आणि तिथून येणारे पर्यटक, कोव्हिड चाचण्यांचे कमी झालेले प्रमाण, तसेच विषाणूच्या बदलत्या स्वरुपात करोनाचा फैलाव पुन्हा होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

आरोग्यमंत्र्यांकडून दक्षतेच्या सूचना

  • मास्कचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले, तरीही स्वतःचा आणि इतरांचाही करोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा
  • ताप, सर्दी खोकला तसेच इतर कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसताच त्वरित चाचणी करून घ्यावी.
  • करोना संसर्गाचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावी- लसीकरण पूर्ण केले नसल्यास ते करून घ्यावे, बूस्टर मात्रा चुकवू नये- शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणांमध्ये जाऊ नये.
  • रुग्णालय, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.
बातम्या आणखी आहेत...