आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मराठा आरक्षणासाठी आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ, फुलंब्री तालुक्यातील घटना

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेकडो मोर्चे काढूनही मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील तरुण मंगेश साबळेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

मंगेशने १५ मे रोजी फेसबुक लाइव्हद्वारे तसेच निवेदन देऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा पाच मराठा तरुण पाच सार्वजनिक ठिकाणी आत्महत्या करणार असल्याचा इशारा दिला होता. तेव्हापासून साबळे गावातून फरार होता. वडोदबाजार पोलिस त्याचा शोधही घेत होते. नागपूर व मुंबई मंत्रालय तसेच औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय येथे मंगळवारी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगळवारी सकाळी मंगेश औरंगाबादहून फुलंब्रीकडे जात असल्याचे कळल्यावर पोलिसांनी त्याची दुचाकी अडवली व त्याला ताब्यात घेतले. या वेळी त्याने अंगावर कॅनमध्ये आणलेले पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

शोधही घेत होते. नागपूर व मुंबई मंत्रालय तसेच औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय येथे मंगळवारी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगळवारी सकाळी मंगेश औरंगाबादहून फुलंब्रीकडे जात असल्याचे कळल्यावर पोलिसांनी त्याची दुचाकी अडवली व त्याला ताब्यात घेतले. या वेळी त्याने अंगावर कॅनमध्ये आणलेले पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

बातम्या आणखी आहेत...