आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येचा प्रयत्न:बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणीतील कंत्राटदार व त्यांच्या पत्नीने गुरुवारी (१२ मे) मंत्रालयाच्या जनता जनार्दन या मुख्य प्रवेशद्वारावर अंगावर राॅकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या दोघांना वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

राजू चिन्नापा मरगुंडे हे पत्नीसह मंत्रालयाच्या गेटवर आले आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही होता. ते डांबर कामगार कंत्राटदार आहेत. सार्वजनिक विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. ते उपकंत्राटदार म्हणून कामे घेतात. मूळ कंत्राटदाराने पैसे दिले नाहीत म्हणून बांधकाम विभागाने पैसे द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी त्यांनी परभणी, नांदेड व मुंबईतही उपोषण पुकारले होते. त्यानंतर त्यांची मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकही झाली होती. पण पैसे मिळत नसल्याचे सांगत त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या मागण्यांची सविस्तर माहिती घेतली.

बातम्या आणखी आहेत...