आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिया सुळेंची थेट शहांकडे तक्रार:मविआ आमदारांना धमकावणारा शिंदेगटाचा व्हिडिओ केला शेअर, म्हणाल्या- त्यांना लोकशाही मूल्ये शिकवा!

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात माविआच्या आमदारांबद्दल हिंसक विधाने करून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी तक्रार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी या सत्ताधाऱ्यांनी असभ्य वर्तन केले आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करावी. तसे शिंदे गटाच्या आमदारांना कायदा व लोकशाही मूल्ये शिकवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ घडला. यावेळी सत्ताधारी-विरोधकांनी आमने-सामने येत राडा घातला. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. आमदार एकमेकांच्या अंगावर धावून आले. शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले. यावरुन यावरुन वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रीया उमटतांना दिसत आहेत. अजित पवारांनी शिंदे गटाच्या आमदारांना आमच्या घोषणा झोंबल्याचे म्हटले होते. तर आता सुप्रिया सुळेंनीही सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे.

माविआ आमदारांना Z+ सुरक्षा द्या

गृहमंत्री अमित शहा यांना उद्देशून ट्वीट केले आहे. त्या म्हणाल्या, शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात माविआच्या आमदारांबद्दल हिंसक विधाने करून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्या भाजप पक्षासोबत युती सरकार चालवणाऱ्या लोकांच्या या वागणुकीबाबत कारवाई करावी या आमदारांकडून माविआ आमदारांच्या सुरक्षेला असलेला धोका पाहता त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी ही आमची मागणी आहे.

राज्यात राज्यपाल राजवट लागू करा

महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करावी. परिस्थिती पाहता जोपर्यंत शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकशाही मूल्यांचे धडे मिळत नाहीत, तोपर्यंत राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्याचा विचार करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ही घटना निदर्शनास आणून दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...