आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव सुरू आहे. कोकणातील खेड तालुक्यातील लोटे येथील दाऊदची मालमत्ता स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काटे यांनी सर्वाधिक १ कोटी १० लाखांची बोली लावून खरेदी केली. ‘सेफमा’ संस्थेने हा ऑनलाईन लिलाव आयोजित केला होता.
या मालमत्तेचा आधार मूल्य १ कोटी ९ लाख १५ हजार ५०० रुपये होते. नोव्हेंबरमध्ये इतर सहा मालमत्तांसह ३० गुंठे जागेसह या मालमत्तेचा लिलाव होणार होता. पण शेवटच्या क्षणी सेफमा अथॉरिटीला तांत्रिक बिघाड जाणवला आणि यामुळे मालमत्तेचा लिलाव त्या वेळी झाला नव्हता. मंगळवारी झालेल्या लिलावात मालमत्तांमध्ये इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेचा समावेश आहे.
१९९९ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांपासून दाऊद फरार आहे. अंडरवर्ल्ड डॉनच्या मालमत्तांचे लिलाव करून सरकारने २२,७९,६०० रुपये कमावले आहेत. यापूर्वी दाऊद इब्राहिमच्या सहा मालमत्तांचा लिलाव झाला होता. या मालमत्ता दिल्लीतील दोन वकिलांनी खरेदी केल्या आहेत. त्यापैकी काही मालमत्ता खेडमधील मुंबकेमधील आहेत. वकील अजय श्रीवास्तव यांनी दोन तर वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी चार मालमत्ता विकत घेतल्या. लिलाव प्रक्रियेदरम्यान सरकाच्या वतीनेे दाऊदचा निकटवर्तीय इक्बाल मिर्चीची मालमत्ता विक्री करण्यासाठीही बोलीही लावली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.