आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नामांतराची मागणी:औरंगाबाद विमानतळाला अजिंठा वेरूळ लेणीचे नाव द्यावे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संभाजी महाराजांच्या नावाचा कोणीही राजकारणासाठी वापर करू नये : रामदास आठवले

औरंगाबाद विमानतळाला अजिंठा वेरूळ लेणीचे नाव द्यावे. या दोन्ही बौद्ध संस्कृतीच्या लेणी असून जागतिक वारसा स्थळ तथा 8 जागतिक आश्चर्य स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे औरंगाबाद विमानतळाला अजिंठा वेरूळ लेणीचे नाव द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी असून आमचा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही. त्यांच्या नावाचा कोणीही राजकारणासाठी वापर करू नये. असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने औरंगाबद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव संमत केला होता. यानंतर रामदास आठवले यांनी आपल्या पक्षाचा छत्रपती संभाजी महराजांच्या नावाला विरोध नाही मात्र औरंगाबादमध्ये बौद्ध संस्कृतीच्या जागतिक स्तरावर नावलौकिक असणाऱ्या अजिंठा-वेरूळ या लेण्या आहेत. या लेण्या पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक औरंगाबादला येतात. आठ जागतिक आश्चर्यांपैकी एक असणारे अजिंठा वेरूळ लेणीचे नाव औरंगाबाद विमानतळाला द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. 'शांतता, अहिंसा, प्रज्ञा, शील, करुणा, सत्य' या बौद्ध संस्कृतीच्या तत्वांचे प्रतिक हे जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या बौद्ध लेणींचे नाव औरंगाबाद विमानतळाला द्यावे अशी मागणी आज रामदास आठवले यांनी केली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser