आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांसह 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, ‘म्हाडा’चे सीईओ म्हैसकर यांचीही बदली

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादला नवे जिल्हाधिकारी म्हणून कोण रुजू होणार हे अजून गूलदस्त्यातच

औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चाैधरी यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी सोमवारी एकूण सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची कमी महत्त्वाच्या अशा महसूल व वन विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. म्हैसकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांपैकी एक होते, असे सांगितले जाते. म्हैसकर तसेच सर्व शिक्षा अभियानाच्या प्रकल्प संंचालक अश्विनी जोशी यांची बदली करण्यात आली आहे. सध्या त्या प्रतीक्षा यादीत आहेत.

औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांच्या कार्यालयात उपसचिव पदावर बदली करण्यात आली आहे. मात्र चौधरी यांच्या जागी औरंगाबादला नवे जिल्हाधिकारी म्हणून कोण रुजू होणार हे अजून गूलदस्त्यातच आहे.

जलस्वराज्य प्रकल्प व्यवस्थापक ए. ए. गुल्हाने यांची बदली चंद्रपूरचे जिल्हाधिकारी या पदावर करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांची ऊर्जा विभागातील ‘महाजेनको’च्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान शिर्डीचे श्री साईबाबा संस्थानचे चौथे सीईओ म्हणून के.एच. बगाटेे यांची नियुक्ती करण्यात आली. ते मंगळवारी पदभार स्वीकारतील. ते डिसेंबरपासून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदावर होते. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांची बदली झाली होती. त्यानंतर ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. यापूर्वी त्यांनी नाशिक अतिरिक्त जिल्हाधिकारी व नंदुरबार जिल्ह्यात सरदार सरोवर प्रकल्पामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर काम केले आहे

बातम्या आणखी आहेत...