आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएम विरुद्ध राष्ट्रवादी:राज ठाकरेंच्या मागे भाजपचा नाही तर राष्ट्रवादीचा हात; खासदार जलील यांची राष्ट्रवादीवर टीका

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यामागे भाजप आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र स्वत:ला मोठे करण्यासाठी इतर पक्षांकडून हे सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नाव न घेता खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे, त्यांना मागील काळातील घटना पाहता यामागे कोण आहे हे सांगण्याची गरज नाही, असे म्हणत जलील यांनी राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. सभेनंतरही राज ठाकरेंवर जलील आणि ओवैसी यांनी टीकास्त्र डागले होते.

राज ठाकरेंच्या भाषणात युवकांसाठी काय?
राज ठाकरेंच्या कालच्या भाषणात युवकांसाठी काय होते, असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी विचारला आहे. युवक जेलमध्ये गेले की त्यांना सोडवायला कुणी येणार नाही, त्यांचे कुटुंबिय रडत असेल मात्र पक्षीय नेते त्यांना भेटायला जाणार नाही. असे म्हणत जलील यांनी युवकांना आपल्या रोजगारांसाठी लक्ष केंद्रीत करा असा सल्ला दिला आहे. पेट्रोलचा दर 100 रुपयांपार गेला आहे. अशात नौकरी टिकेल का? इएमआय फेडायला पैसै आहेत का नाही असे एक ना अनेक प्रश्न युवकांसमोर आहेत त्यावर 10 मिनटे राज ठाकरेंना द्यावे वाटले नाही.

राज ठाकरेंना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही
राज ठाकरेंनी छत्रपती शसिवाजी महाराज यांचे पुस्तके वाचली नाहीत, त्यांनी ती वाचायला हवी होती. असे झाले असते तर त्यांना समजले असते की, महाराजांनी कधीच धार्मिक त्रेढ निर्माण केला नाही. किंवा कोणत्या धर्मांमध्ये द्वेष भावना निर्माण केली नव्हती. असे सांगताना राज ठाकरेंना शिवाजी महाराजांचे पुस्तक देणार असून त्यातून त्यांनी महाराजांचे काही गुण आत्मसात करावे, असा सल्ला खासदार जलील यांनी दिला आहे. राज टाकरेंना महाराज समजले असते तर ते असे वागलेच नसते असा टोला त्यांनी लगावला आहे.

देशातल्या 98 टक्के लोकांना शांतता हवी
या भाषणाचा तरूणांवर काही परिणाम होणार नाही. देशातील 98 टक्के लोकांना शांतता हवी आहे. आणि उरलेल्या दोन टक्के लोक हे काल राज ठाकरेंच्या सभेत होते. असा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला आहे. आजची तरुणपिढी या गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही असे जलील यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...