आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • Australian Batsman Mitchell Marsh, Warner Helped Delhi Win, Delhi Capitals Beat Rajasthan Royals By Eight Wickets

58 वा सामना:ऑस्ट्रेलियन फलंदाज मिचेल मार्श, वॉर्नरच्या खेळीने दिल्ली विजयी, दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला आठ गड्यांनी पराभूत केले

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल २०२२ च्या बुधवारी झालेल्या ५८ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियन जोडी मिचेल मार्श (८९) व डेव्हिड वॉर्नरच्या (५२) अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर ८ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ६ बाद १६० धावा उभारल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १८.१ षटकांत २ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. या विजयासह दिल्लीचे १२ सामन्यांत १२ गुण झाले आहेत. दिल्ली अजून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत कायम आहे.

तत्पूर्वी, राजस्थानतर्फे रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक ५० व देवदत्त पड्डिकलने ४८ धावांची खेळी केली. जोस बटलरच्या (७) रूपाने साकारियाने राजस्थानला पहिला धक्का बसला. सलामीवीर यशस्वी जयस्वालने १९ धावा केल्या. अश्विन व यशस्वीने दुसऱ्या गड्यासाठी ४३ धावांची भागीदारी केली. दिल्लीकडून चेतन साकारिया, नॉर्किया, मिचेल मार्शने प्रत्येकी २ बळी घेतले.

मार्श व वॉर्नरची अर्धशतके; भरत शून्यावर बाद
प्रत्युत्तरात, दिल्लीची सुरुवात खराब झाली. सलामीवीर श्रीकर भरत भोपळाही न फोडत तंबूत परतला. ट्रेंट बोल्टने यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या हाती त्याला झेलबाद केले. त्यानंतर संघाची धुरा आपल्या हाती घेत ऑस्ट्रेलियन जोडी डेव्हिड वॉर्नर व मिचेश मार्शने संघाला विजयी केले. वॉर्नरने ४१ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ५२ धावांची विजयी खेळी केली. मार्शने ६२ चेंडंूत ५ चौकार व ७ षटकारांचा पाऊस पाडत ८९ धावा कुटल्या. वॉर्नर व मार्श जोडीने दुसऱ्या गड्यासाठी १४४ धावांची शतकी भागीदारी रचली. कर्णधार ऋषभ पंत १३ धावांवर नाबाद राहिला. त्याने ४ चेंडंूत २ उत्तुंग षटकार खेचले. युजवेंद्र चहलने एकाला टिपले.

144 धावांची दुसऱ्या गड्यासाठी वॉर्नर व मार्श यांनी भागीदारी केली. 15 सर्वाधिक धावा दिल्या या सामन्यात एका षटकात अश्विनने, फलंदाजीत सर्वाधिक ५० धावा काढल्या.

बातम्या आणखी आहेत...