आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Ayodhya And Shiv Sena Have No Political Relationship; It Is Not Clear Whether Chief Minister Uddhav Thackeray Will Go To Ayodhya Sanjay Raut

मुंबई:अयोध्या आणि शिवसेनेचे राजकीय नातं नाही; उद्धव ठाकरे नेहमीच रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत जातात - संजय राऊत

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रद्धा, हिंदुत्व या भावनेतून शिवसैनिकांनी राम मंदिरासाठी बलिदान दिले - राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार का हा प्रश्न सध्या विचारला जात आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळाले का, याची चर्चा रंगली आहे. मात्र सध्या फक्त तारीख जाहीर झाली आहे. राजकीय सोशल डिस्टन्सिंग ठेऊन कार्यक्रम कसा करता येईल, यावर निर्णय घेतला जाईल.''

श्रद्धा, हिंदुत्व या भावनेतून शिवसैनिकांनी राम मंदिरासाठी बलिदान दिले

पुढे बोलताना ते म्हणाले की, ''अयोध्या आणि शिवसेनेचे राजकीय नाते नाही. उद्धव ठाकरे नेहमीच रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत जातात. जेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते तेव्हा गेले होते आणि आता मुख्यमंत्री झाल्यावरही गेले होते. राजकारणासाठी आम्ही अयोध्येत जात नाही. राम मंदिराचा पूर्ण रस्ता शिवसेनेने तयार केलेला आहे. मंदिरामध्ये येणारे मुख्य अडथळे होते ते शिवसेनेने दूर केले. राजकारण म्हणून नाही, तर श्रद्धा, हिंदुत्व या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान दिले. ते आमचे नातं कायम आहे” असेही राऊत म्हणाले.