आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे गटाचे कळमनुरी (जि. हिंगोली) येथील आमदार संतोष बांगर यांनी संजय राऊत यांच्यावर विखारी टीका केली. यानंतर आता बांगर यांच्यावरही शिवसेनेतून टीकेची झोड उठली आहे. शिवसेनेच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांनी प्रत्युत्तर दिले. संतोष बांगर तुम्ही फक्त पोकळ धमक्या देऊ शकता. तुम्ही काहीही करू शकत नाही. हिमंत असेल तर माझ्यासमोर या अशा शब्दात त्यांनी आव्हान दिले.
थोतांड माणूस म्हणत टीकास्त्र
अयोध्या पौळ म्हणाल्या, एक थोतांड माणूस पुन्हा एकदा बरळले. त्या चौथी नापास, थोडांत माणसाला सांगायचे आहे की, संतोष बांगर तुम्ही फक्त पोकळ धमक्या देऊ शकता. तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही सुरुवातीला जेव्हा धमक्या दिल्या त्यानंतर मी तुमच्या हिंगोलीत दोन दिवस एकटीच फिरत होते. तुम्ही आणि तुमचे चेले काहीही करू शकले नाहीत.
कानाखाली काढण्याचा अधिकारच नाही
अयोध्या पौळ म्हणाल्या, चौथी नापास माणसाला संविधान माहीत नसेल तर मी म्हणेल की, संतोष दादा तू संविधान वाच. संविधानात कुणीच कुणालाही कानाखाली आवाज काढण्याचा अधिकार दिलेला नाही. तु फक्त पोकळ धमक्या देऊ शकतो संतोष दादा.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न
अयोध्या पौळ म्हणाल्या, सर्वात महत्वाचे तू आणि तुझे चेले ज्या 93 लाखांच्या एफडीच्या गोष्टी बोलतात त्या एफडीबाबत जो खोटारडापणा केला त्यावरही मी खुलासा करणार आहे. माझा मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की, नाही. कायदा फक्त सत्ताधारी लोकांच्या सुरक्षेसाठीच आणि विरोधकांनी लिहिल्यानंतर, बोलल्यानंतर त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठीच राहीला आहे का? सत्ताधारी लोक इतरांच्या कानाखाली मारण्याची भाषा करतात, तेव्हा तुम्ही काय करता?
लाचारी पत्करली नाही
अयोध्या पौळ म्हणाल्या, संतोष बांगर यांना सांगायचे की, तुमचे शंभर कोटी, दीडशे कोटींचे व्हिडिओ रेकार्ड व्हायरल झाले. तसे कोटी घेऊन संजय राऊत तिकडे गेले नाहीत. तुमच्यासारखे खोके घेऊन तिकडे गेले नाहीत. प्रत्येकाने लाचारी पत्करलेली नाही.
हिमंत असेल तर समोर या
अयोध्या पौळ म्हणाल्या, माझ्यासमोर येऊन दाखवा. ही शिकलेली, स्वतःच्या पगारावर स्वतःचा आणि आई-वडीलांचा उदरनिर्वाह करणारी स्वाभीमानी मुलगी आयुष्यभर तुमचे जोडे उचलेल. हिमंत असेल तर समोर येऊन दाखवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.