आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधानसभेत भटक्या कुत्र्यांवर आज झालेल्या लक्षवेधीत आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला अफलातून सल्ला दिला. ''भटके कुत्रे ते उचला अन् आसामला नेऊन टाका, आम्ही गुवाहटीला गेलो तेव्हा कळाले तिथे कुत्र्यांना मोठी किंमत आहे. एक कुत्रा आठ हजारांना विकला जातो. आपल्याकडे बोकडे तर तिकडे कुत्रे खातात'' असे म्हणत भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नी त्यांनी जालीम विलाज सुचवला.
विधानसभेत आज (३ मार्च ) भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर आमदार प्रताप सरनाईक, आमदार अतुल भातळखर, आमदार सुनील टिंगरे यांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी प्रहार संघटनेचे मुख्य आणि आमदार बच्चू कडू यांनी भटक्या कुत्र्यांना आसामला पाठववे असा अजब सल्ला बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला.
काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडू म्हणाले, भटक्या कुत्रे असो की, पाळीव एकदम सोपा विलाज आहे. कुत्रे पाळीव असेल तर ते घरी असावेत. ज्यांचे पाळीव कुत्रे रस्त्यावर आले त्यांच्या मालकांवर कारवाई करा. मी म्हणतो मंत्री महोदय या विषयी तुम्ही समिती गठीत केल्यापेक्षा थेट अॅक्शन प्लॅन जाहीर करा.
तिकडे कुत्रे विकतात
बच्चू कडू म्हणाले, ''जेवढे रस्त्यावर आहे तेवढे आसाममध्ये नेऊन टाका, आसाममध्ये आठ ते नऊ हजारांना (खपतो!) विकतो. माहीती घ्या माझ्याकडे ती आहे. आम्ही जेव्हा गुवाहटीला गेलो तेव्हा तेथे आम्ही याबाबत विचारले होते.
तिथल्या सरकारशी बोला विषय संपवा
बच्चू कडू म्हणाले, ''आम्ही जेव्हा तेथे कुत्र्यांबाबत विचारले तेव्हा ते सांगत होते की, जसे इकडे बोकडे खातात तिकडे कुत्रे खातात. तेथील व्यापाऱ्यांना बोलावून यावर उपाययोजना केली तर एका दिवसांत तोडगा निघतो. यासाठी तेथील सरकारशी बोलण्याची गरज आहे. याचा उद्योग होईल आणि ते घेऊन जातील. त्या कुत्र्यांचा व्यापार होईल, आणि हा विषय एकदम संपवून टाका.''
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.