आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटकेची मागणी होताच बच्चू कडूंनी मागितली माफी:म्हणाले- आसाम नव्हे तर नागालँडमधील लोक कुत्रे खातात; राज्ये जवळपास असल्याने गोंधळ

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपक्ष आमदार कडू यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर बोलताना आसाममध्ये लोक कुत्रे खातात असे वक्तव्य केले होते, यावर आसामच्या विधानसभेत जोरदार गोंधळ झालेला पाहायला मिळाला. यावेळी बच्चू कडूंच्या अटकेचीही मागणी करण्यात आली. यानंतर मात्र बच्चू कडून यांनी माफी मागत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

आमदार बच्चू कडू म्हणाले की, नागालँडमधील लोक कुत्रे खातात. मला वाटले आसाममधील लोक कुत्रे खातात. दोन्ही राज्ये जवळपासच आहेत. माझ्याकडून चुकून आसाम नाव घेतले गेल, तिथे नागालँड म्हणायला हवे होते. एवढीच माझी चूक आहे. यामुळे त्या राज्यातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी माफी मागतो. म्हणत त्यांनी सारवासारव केली आहे.

काय म्हणाले होते कडू

भटके कुत्रे ते उचला अन् आसामला नेऊन टाका, आम्ही गुवाहटीला गेलो तेव्हा कळाले तिथे कुत्र्यांना मोठी किंमत आहे. एक कुत्रा आठ हजारांना विकला जातो. आपल्याकडे बोकडे तर तिकडे कुत्रे खातात'' असे म्हणत भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नी त्यांनी जालीम विलाज सुचवला.

विधानसभेत (३ मार्च ) भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर आमदार प्रताप सरनाईक, आमदार अतुल भातळखर, आमदार सुनील टिंगरे यांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी प्रहार संघटनेचे मुख्य आणि आमदार बच्चू कडू यांनी भटक्या कुत्र्यांना आसामला पाठववे असा अजब सल्ला बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला.

काय म्हणाले बच्चू कडू?

बच्चू कडू म्हणाले, भटक्या कुत्रे असो की, पाळीव एकदम सोपा विलाज आहे. कुत्रे पाळीव असेल तर ते घरी असावेत. ज्यांचे पाळीव कुत्रे रस्त्यावर आले त्यांच्या मालकांवर कारवाई करा. मी म्हणतो मंत्री महोदय या विषयी तुम्ही समिती गठीत केल्यापेक्षा थेट अ‌ॅक्शन प्लॅन जाहीर करा.

तिकडे कुत्रे विकतात

बच्चू कडू म्हणाले, ''जेवढे रस्त्यावर आहे तेवढे आसाममध्ये नेऊन टाका, आसाममध्ये आठ ते नऊ हजारांना (खपतो!) विकतो. माहीती घ्या माझ्याकडे ती आहे. आम्ही जेव्हा गुवाहटीला गेलो तेव्हा तेथे आम्ही याबाबत विचारले होते.

तिथल्या सरकारशी बोला विषय संपवा

बच्चू कडू म्हणाले, ''आम्ही जेव्हा तेथे कुत्र्यांबाबत विचारले तेव्हा ते सांगत होते की, जसे इकडे बोकडे खातात तिकडे कुत्रे खातात. तेथील व्यापाऱ्यांना बोलावून यावर उपाययोजना केली तर एका दिवसांत तोडगा निघतो. यासाठी तेथील सरकारशी बोलण्याची गरज आहे. याचा उद्योग होईल आणि ते घेऊन जातील. त्या कुत्र्यांचा व्यापार होईल, आणि हा विषय एकदम संपवून टाका.''

बातम्या आणखी आहेत...