आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना ठाणे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर ही नोटीस पाठवल्याचे समजते.
धीरेंद्र शास्त्री यांच्या रामकथा वाचनाचा रविवारी ठाण्यात कार्यक्रम झाला. या कार्यक्रमापूर्वीच त्यांना ही नोटीस पाठवल्याचे समजते. आता पोलिस पुढे काय पाऊल उचलतात हे पाहावे लागेल.
कार्यक्रम नेमका कसा?
ठाण्यात सध्या धीरेंद्र शास्त्री यांच्या हनुमान कथेचा कार्यक्रम 7 मेपासून सुरू आहे. त्यांचा आज 8 मे रोजी दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत दिव्य दरबार असल्याचे समजते. तसेच उद्या 9 मे रोजी सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत त्यांच्या हनुमान कथेचा कार्यक्रम पुन्हा होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाआधीच धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात ठाणे पोलिसांकडे तक्रार आली होती. त्यानुसार त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
तक्रार नेमकी काय?
वंचित बहुजन आघाडी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठाणे पोलिसांना एक लेखी पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेत अडचण निर्माण होईल, असे कोणतेही वक्तव्य बागेश्वर धामच्या बाबांनी करून नये. या तक्रारीनंतर अंबरनाथच्या शिवाजी नगर पोलिसांनी धीरेंद्र शास्त्रींना कलम 149 अंतर्गत नोटीस जारी केली आहे.
उत्तराची उत्सुकता
धीरेंद्र शास्त्री यांच्या ठाण्यातल्या कार्यक्रमांना लाखो भाविक हजेरी लावत आहेत. हनुमान कथेच्या पहिल्याच दिवशी जवळपास दोन लाख भाविक उपस्थित असल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमधूनही मोठ्या संख्येने भाविक आलेत. या नोटीसनंतर धीरेंद्र शास्त्री काही बोलतात का, काही उत्तर देतात का, याची उत्सुकता आहे.
संबंधित वृत्तः
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.