आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आठवा स्मृतीदिन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतिदिन आहे. त्या निमित्त राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर येण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन केले. यावेळी उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, सुपुत्र आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला अभिवादन केले.

दरवर्षी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जात असतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट आहे. यामुळे गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...