आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजकारण:बाळासाहेब ठाकरेंनी राज्याला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, जातीय मुद्द्यावरून संजय राऊतांचे फडणवीसांना उत्तर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझी जात ब्राह्मण असल्यामुळे मला टीकेचा धनी केले जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता

माझी जात ब्राह्मण असल्यामुळे मला टीकेचा धनी केले जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. फडणवीसांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मनोहर जोशी यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्र जात-पात-धर्म मानत नाही. याआधी महाराष्ट्राने मुस्लिम मुख्यमंत्री पाहिला आहे. अनेक अल्पसंख्याक मंत्री राज्यात होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला होता. तसेच त्यांनी मराठा मुख्यमंत्री देखील दिला आहे. महाराष्ट्र जात-पात-धर्म मानत नाही ”

काय म्हणाले होते फडणवीस?

'आरक्षणाबद्दल मी बेजबाबदार वक्तव्य करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी समाजाच्या मनात संभ्रम निर्माण करू नये. काही लोकं फक्त राजकीय स्वार्थासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे खापर केंद्रावर फोडत आहेत. राज्याचा कायदा असल्याने केंद्राचा संबंध नाही, असे फडणवीस म्हणाले. याशिवाय फडणवीसांनी त्यांच्यावर होत असलेल्या वयक्तित टीकेवर बोलताना म्हणाले की, 'माझी जात ब्राह्मण असल्यामुळे मला टीकेचा धनी केले जात आहे. पण, मराठा समाजाला माहित आहे की, त्यांच्यासाठी मी किती केले आहे,' असे फडणवीस म्हणाले होते.