आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Balasaheb Thackeray Is Very Much Remembered Today Uddhav Thackeray, Like His Elder Brother, Takes Everyone's Mistakes In His Stomach, Says MP Supriya Sule

बाळासाहेब ठाकरेंची आज खूप आठवण येतेय:उद्धव ठाकरे मोठ्या भावाप्रमाणे सर्वांच्या चुका पोटात घेतायत : सुप्रिया सुळे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील राजकीय परिस्थितीवर सुप्रिया सुळेंनी भाष्य केले आहे. घरातील मोठा भाऊ कसा असतो हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिले. ते सर्वांच्या चुका पोटात घेत आहे. बाळासाहेबांची छवी ही उद्धव ठाकरेंमध्ये दिसून येते. स्वत: बाळासाहेबांनी ही जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. त्यांचे आवाहन हे भावनिक आहे.

सोशित, पीडित वंचितांसाठीचे जीआर काढले. ते चांगलेच काम करीत आहेत उलट याचे कौतूक करायला हवे. मात्र त्यांवरही लोक टीका करताय असा टोला त्यांनी लगावला आहे. आज बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते. उद्धव ठाकरे यांचे ट्विट पाहिले. बाळासाहेब ठाकरे आणि माॅंसाहेब यांनी शिवसेना उभारली. शिवसेना कुटुंबासारखी सदैव टिकून राहील असेही त्या म्हणाल्या.

बैठका घेण्याचे अधिकार भाजपला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना नाही म्हणणारे कोण, हे द़डपशाहीचे सरकार नव्हते आणि नसेल. जनतेच्या हितासाठी जीआर काढले हेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. कुटुंबात भांड्याला भांडे लागतेच असेही सुळे म्हणाल्या. सत्ता येते आणि जातेय. मात्र जे काम सुरू आहे ते जनतेच्या सेवेसाठी आहे. वंचित, पिडीतांच्या सेवेसाठी जीआर काढत आहे. नाती असतात तेव्हा जवाबदाऱ्या येतात. भाजपसोबत सरकार बनवले तर ते वापस येतील असे ते म्हणतात पण बाळासाहेब आणि माँसाहेब ठाकरेंचे उत्तराधिकारी उद्धव ठाकरेच आहेत. जी समस्या आहे ती घरी येऊन एकनाथ शिंदेंनी सांगायला हवे. संवाद करायला हवा. उद्धव ठाकरे समोरा-समोर बसायला तयार आहेत. असे म्हणत बंडखोर आमदारांना एकप्रकारे आवाहन केले आहे.