आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याचे अनावरण:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनाप्रमुखांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आह

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. 9 फूट उंच आणि 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा तयार केला आहे.

आजोबांचे मुंबईवर खूप प्रेम होते. बाळासाहेब ठाकरेंनी सर्वासोबत मैत्री जपली, त्यांचा पूर्णाकृती पुतळा बघताना आनंद होतो असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...