आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीका:बाळासाहेब क्राऊड पूलर होते, हे पवारांनाही मान्य होते, मात्र ब्रँड ठाकरे ही ओळख सध्याच्या संपादकांनी मिटवली, नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत शरद पवारांनी अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तर दिली आहेत. आज या मॅरेथॉन मुलाखतीचा पहिला भाग आला आहे. राज्यातील राजकारणातील या मुलाखतीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दरम्यान शरद पवारांच्या मुलाखतीनंतर नितेश राणेंनी ट्विट करत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. 

नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, 'लहानपणापासून सामनामध्ये केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या मॅरेथॉन मुलाखती आपल्याला माहिती आहेत. ही त्यांच्या चाहत्यांसाठी आणि त्यांच्या विरोधक अशा दोघांसाठीही मेजवानी असायची. बाळासाहेब ठाकरे हे एक गर्दी खेचणारे (क्राऊड पूलर) नेते होते. एवढेच काय तर शरद पवार देखील हे मान्य करायचे. मात्र, आता ब्रँड ठाकरे ही ओळख सध्याच्या सामनाच्या संपादकांनी संपवली आहे.' असे म्हणत नितेश राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. 

Advertisement
0