आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरत गुजरात येथे जात असलेल्या राज्यभरातील नेते व कार्यकर्त्यांना गुजरात पोलिस वेगवेगळ्या ठिकाणी अडवून ताब्यात घेत आहेत. असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी गुजरात पोलिसांवर केला आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, गुजरात पोलिस काँग्रेस कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे निषेधार्ह आहे. गुजरात पोलिसांची वर्तणूक लोकशाहीची गळचेपी करणारी आहे. याआधी अशाच प्रकारचा गंभीर आरोप काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनीही केला आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, आमचे नेते राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी सुरतला जाणाऱ्या काँग्रेस नेत्यांना पोलिसांकडून अडवले जात आहे. त्यांच्या वाहनांची झडती घेतली जात आहे. गुजरातला जाताना माझे वाहन थांबवण्यात आले. माझे ओळखपत्र तपासण्यात आले, त्याचे फोटो काढण्यात आले. अशी माहिती आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
लोकशाहीत विरोधी नेत्यांसोबत हे वर्तन गंभीर आहे. अशा शब्दांत गुजरात पोलिसांवर टीका करताना काँग्रेसचे आमदार यांनी सांगितले की, मला सांगण्यात आले की, माझे लाइव्ह थेट गांधीनगरमध्ये दाखवले जात आहे. तुम्ही गांधीनगर दाखवा किंवा पंतप्रधान कार्यालय. आम्ही घाबरत नाहीत, एवढेच काय तर तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही, असे प्रत्युत्तर या नेत्याने दिले.
लोकसभेचे सदस्यत्व रद्दबातल झाल्यानंतर 11 दिवसांनी राहुल गांधी सोमवारी सुरत न्यायालयाकडे रवाना झालेत. राहुल यांच्यासोबत प्रियंका गाधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह लीगल टीमही सुरतला जाणार आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
सुरत न्यायालयाने 23 मार्च रोजी राहुल गांधींना मानहाणीच्या एका प्रकरणात दोषी ठरवले होते. तसेच त्यांना 2 वर्षांची कैद व 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. कोर्टाने राहुल यांना शिक्षेला आव्हान देण्यासाठी 30 दिवसांचा अवधीही दिला होता. त्यानंतर आता राहुल न्यायालयात दाद मागत आहेत.या कारवाईनंतर 24 मार्च रोजी राहुल यांचे लोकसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते. यामुळे काँग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहांसह संपूर्ण देशात केंद्राच्या कथित दडपशाहीविरोधात निदर्शने केली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.