आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Balasaheb Thorat Comment On Ram Mandir Foundation Program,says Modi Govt Organize Ayodhya Ram Mandir Foundation Ceremoney To Distract Peoples Attention From Coronavirus Failure

राम मंदिर भूमिपूजनावरून टीका:कोरोनाच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून राम मंदिराची पायाभरणी, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा घणाघात

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीराम दैवत, पण रामाचे दर्शन घ्यायला आपण जगलो पाहिजे - बाळासाहेब थोरात

येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही राम मंदिरच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावर भाजपवर सडकून टीका केली. कोरोनाची परिस्थितीत हाताळण्यात सरकारला आलेल्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केला जात असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. 

श्रीराम दैवत, पण रामाचे दर्शन घ्यायला आपण जिवंत राहिले पाहिजे 

बाळासाहेब थोरात म्हणाले की, श्रीराम हे दैवत आहेत. पण रामाचे दर्शन घ्यायला आपण जगलो पाहिजे. आपण जिवंत राहिलो तर रामाचे दर्शन घ्यायला जाऊ. मात्र कोरोनाच्या काळात सरकारच्या अपयशावरुन लक्ष विचलित करण्यासाठीच राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. 

भूमिपूजनावरून शरद पवार यांनीही सरकारवर साधला होता निशाणा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. कोरोनामुळे जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. या संकटात सापडलेल्या नागरिकांना कसे बाहेर काढता येईल याबाबत आम्ही विचार करतोय. त्याला आम्ही प्रथम प्राधान्य देतोय. पण काहींना वाटतंय मंदिर बांधल्याने करोना जाईल, त्यामुळे त्यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असावा, असे पवार यांनी म्हटले होते.