आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे काम चांगले असून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडाव्यात अशी भूमिका काँग्रेसचे मंत्री, नेत्यांनी प्रभारींपुढे मांडल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस नेतृत्व बदलाच्या चर्चा आता थंडावणार असल्याचे मानले जाते.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी बुधवारी बैठकीत प्रमुख नेते, जिल्हाध्यक्ष, कॅबिनेट - राज्यमंत्री व आमदारांशी नेतृत्व बदलाबाबत वन-टू-वन चर्चा केली. पुढील २-३ महिन्यांत ५ मनपा व १०० नगरपंचायतींच्या निवडणुका आहेत. शिवाय २०२२ मध्ये १५ मनपांसह २७ जिल्हा परिषद निवडणुका आहेत. अशा वेळी पक्षाचे नेतृत्व बदलणे फारसे लाभदायक ठरणार नाही. दीड वर्षापूर्वी थोरातांकडे नेतृत्व आले. आघाडी सरकार व पक्षात थोरातांनी उत्तम समन्वय ठेवला आहे. त्यांच्याकडे आणखी दीड-दोन वर्षे नेतृत्व ठेवावे, अशी भूमिका बहुतांश मंत्री व नेत्यांनी पाटील यांच्याकडे मांडल्याचे समजते. दरम्यान, ही बैठक नेतृत्व बदलाबाबत नव्हती, प्रभारींनी मुंबई मनपासह इतर बाबींवर चर्चा केल्याचे अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर सांगितले.
थोरात-पाटील यांच्यात वाद
प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे सख्य नाही. थोरात यांच्याकडे तीन पदे असल्याने प्रदेशाध्यक्षपदाला ते वेळ देऊ शकत नाहीत अशी पाटील यांची तक्रार होती, तर पाटील हे राज्यातले निर्णय परस्पर घेतात यासंदर्भात थोरात यांनी दिल्लीकडे तक्रार केली होती. त्यातून पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली गतिमान केल्या हाेत्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.