आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संन्यास विधानावर ट्रोल:वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे फडणवीस म्हणाले होते, त्याचे काय? बाळासाहेब थोरात यांचा खोचक प्रश्न

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धनगर आरक्षणदेखील पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निकाली काढणार होते

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील विधानावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच टीका टिप्पणी होत आहे. भाजपने 26 जून संपूर्ण राज्यात पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी राज्यात भाजपची पुन्हा सत्ता आल्यास तीन महिन्यांत ओबीसींना राजकीय मिळवून देतो अन्यथा राजकारणातून संन्यास घेईल असे विधान केले होते. यावरुन संपूर्ण सोशल मीडियात फडणवीसांची खिल्ली उडवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेतांना चांगलाच टोला लगावला आहे.

फडणवीसांचे कोणतेच विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कारण त्यांनी स्वतंत्र विदर्भासाठीदेखील असाच पवित्रा घेतला होता. ते म्हणाले होते की, जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही? आता त्याचे काय झाले? असा खोचक सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की, धनगर आरक्षणदेखील पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निकाली काढू असे फडणवीस म्हणाले होते. आता ओबीसी आरक्षण तीन महिन्यांत मिळवून दिले नाहीतर राजकीय संन्यास घेईन असे म्हणत आहे. त्यामुळे हे विधानदेखील गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे थोरात म्हणाले.

फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही - राऊत
देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल असून ते लढवय्ये नेते आहेत त्यामुळे अशा नेत्यांची देशाला नितांत गरज आहे. फडणवीस यांनी राजकीय संन्यास घेतल्यास भाजपसह जनतेचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे फडणवीस यांना अशी संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही. ते जर संन्यास घेत असतील मी त्यांना भेटून मन वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...