आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना-शिवसेना वाद:सत्तेसाठी बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेना 'सोनिया सेना' झाली, कंगना रनोटचे शिवसेनेवर पुन्हा शरसंधान

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महानगरपालिकेने कारवाई केल्यानंतर कंगनाने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिले होते

राज्यातील कंगना विरुद्ध शिवसेनेचा वाद थांबताना दिसत नाहीये. राज्य सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या कंगना रनोटच्या कार्यालयावर कारवाई करत मुंबई महानगरपालिकेने कंगनाला दणका दिला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत संबोधत आव्हान देऊन अवघे काही तास उलटले नाहीत, तोच कंगनाने शिवसेनेवर पुन्हा शरसंधान साधले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली आहे, अशी कडवट टीका अभिनेत्री कंगना रनोटने केली आहे.

काय म्हणाली कंगना?

“श्री बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारसरणीवर शिवसेना निर्माण केली, आज तीच विचारधारा सत्तेसाठी विकली आणि शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली. ज्या गुंडांनी माझ्या माघारी माझे घर फोडले, त्यांना नागरी संस्था म्हणून संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका” असे ट्विट कंगनाने केले आहे.

कंगना मुख्यमंत्र्यांना काय म्हणाली होती?

कंगना म्हणाली, ''उद्धव ठाकरे, तुम्हाला काय वाटते, चित्रपट माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर तोडून मोठा सूड उगवला. तुम्ही खूप मोठे उपकार केले आहे. काश्मिरी पंडितांसोबत काय घडले असेल, हे मला माहित होते. मात्र आज मला याची जाणीव झाली आहे. आज मी तुम्हाला एक वचन देते की, मी केवळ अयोध्येवरच नाही तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवेल. मी माझ्या देशातील लोकांना जागे करेन. ठाकरे जे क्रौर्य आणि दहशत माझ्याबाबतीत घडली आहे, त्याला नक्कीच अर्थ आहे. जय हिंद. जय भारत'', अशा शब्दांत कंगनाने आपला संताप व्यक्त केला होता.