आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणछोडदास कुणाला घाबरून पळाले..?:बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची टीका

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्लक सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सिल्लोड मधील त्यांची नियोजित सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियोजित सभेपासून रणछोडदास कुणाला घाबरून पळाले..? असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी विचारला आहे.

खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे आणि आपले भाषण ऐकायला कुणीच येणार नाही अशी भीती वाटल्यामुळे ते पळाले का..? आमच्या एका खासदारांचा आपण धसका घेतलात..? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. आम्हाला सांगितले असते तर आम्ही तुम्हाला व्यासपीठ आणि खुर्च्या उपलब्ध करून दिल्या असत्या, असा सल्ला म्हस्के यांनी आदित्य यांना दिला.

नुसत्या पोकळ वल्गना तुमच्या

एखाद्याशी स्पर्धा करताना आपली योग्यता आपण तपासली पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानी माझ्यासोबत बसून चर्चा करावी असे आव्हान देता. मग आता सभा घ्यायची ना. नुसत्या पोकळ वल्गना तुमच्या, अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी ​​​सिल्लोडमधील ​​​महावीर चौकात मुख्य रस्त्यावर परवानगी पोलिस प्रशासनाकडे मागितली होती. परंतु ऐन रस्त्यात सभा टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने बायपासलगत मोकळ्या जागेत आदित्य यांच्या सभेला परवानगी दिली आहे. मी शेतकऱ्यांना भेटीसाठी सिल्लोडला येणार आहे. माझी ती राजकीय सभा नसेल असे आदित्य ठाकरेंनी आज स्पष्ट केले. यावरून विरोधकांकडून आदित्य ठाकरेंवर टीका केली जात आहे.

आदित्य ठाकरेंच्या सिल्लोडच्या सभेला परवानगी

अब्दुल सत्तारांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे. पण आदित्य ठाकरेंच्या सभेच्या परवानगीवरुन जो वाद सुरू होता त्यावर आता पडदा पडला असून आदित्य ठाकरेंची सभेला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही सभांची टस्सल सिल्लोडमध्ये सात नोव्हेंबरला दिसणार आहे. येथे पुर्ण बातमी वाचा.

नरेश म्हस्केंचा आरोप, म्हणाले - बारामती बालेकिल्ला मग अर्थमंत्र्यांच्या दौऱ्याला का घाबरले?

युती सरकारविरोधात कोण जास्त बोलतेय अशी स्पर्धाच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात लागली आहे. त्यामुळे अजित पवारांनी युती सरकारच्या भविष्याबद्दल भाष्य केले असावे. सरकार किती दिवस टिकणार कोणासोबत कोण गेले आणि कोण जाणार यात वेगळे सांगण्याची काय गरज आहे. हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व आमदार आहेत. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...