आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धीर सोडू नका, विजय आपलाच:रडायचे नाही लढायचे ही बाळासाहेबांची शिकवण; संजय राऊतांचे ईडीकोठडीतून विरोधकांना पत्र

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्राचाळ प्रकरणात खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. राऊतांनी कोठडीतून मित्रपक्षांना पत्र लिहित रडायचे नाही लढायचे , विजय आपलाच होणार ही बाळासाहेबांची शिकवण आहे. तर संकट काळात साथ देणाऱ्या सर्वांचे आभारही त्यांनी या पत्रातून मानले आहे. या संकट काळात आपले कोण, परके कोण हे समजल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

काय म्हणाले राऊत?

भाजप आणि केंद्र सरकारने आपल्याविरोधात राजकीय सूड नाट्य रचल्याचा आरोपही खासदार संजय राऊत यांनी या पत्रातून केला आहे. मात्र, यापुढे शिवसेना झुकतं आणि नमतं घेणार नाहीच, आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत असे त्यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे. तसेच या युद्धात आपलाच विजय होईल असा दावाही त्यांनी पत्रातून केला आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांना पाठवलेलं पत्र सध्या सोशल मीडियातून व्हायरल होत आहे.

माझ्यावर झालेल्या कारवाईविरोधात कृती आणि विचारातून आपण जो पाठिंबा दिला आहे. अनेक सहकाऱ्यांनी संसदेत आणि संसदेबाहेर उपस्थित केलेल्या मुद्यावर आपण सर्वांनी पाठिंबा दिला, त्यासाठी आभार मानत असल्याचे राऊत यांनी म्हटले. काँग्रेससह इतर पक्षांनी राऊत यांच्या अटकेचा निषेध केला होता. संजय राऊत यांनी म्हटले की, मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार वागत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला 'रडायचं नाही लढायचं' अशी शिकवण दिली होती. याच शिकवणीला अनुसरून मी वागत आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...