आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज प्रकरण:मेहुण्यामुळे अभिनेता विवेक ओबेरॉय अडचणीत, बंगळुरू पोलिसांचा मुंबईतील घरावर छापा, मेहुणा आदित्य अल्वाचा शोध सुरू

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री रागिणी द्विवेदी, रविशंकर, शिवप्रकाश, राहुल शेट्टी आणि वीरेन खन्ना यांना आतापर्यंत अटक
  • आदित्य कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे

अभिनेता विवेक ओबेराॅयच्या मुंबईतील घरावर बंगळुरू पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी छापा मारला. विवेकचा मेहुणा आदित्य अल्वा बंगळुरू ड्रग्ज प्रकरणात आराेपी आहे. त्याचा शाेध घेण्यासाठी पाेलिसांनी छापा मारला. आदित्यच्या विराेेधात गुन्हा दाखल झाल्यापासून ताे फरार आहे. सीसीबीने काेर्टाचे वाॅरंट घेऊन विवेकच्या घराची झडती घेतली.

या छाप्यासंदर्भात एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आदित्य अल्वा हा विवेक ओबेरॉयच्या घरात लपला असल्याची माहिती हाेती. बंगळुरू पोलिसांनी आदित्य अल्वाच्या घराचीही झडती घेतली आहे. आदित्य कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे.

आजवर यांना झाली अटक

अभिनेत्री रागिणी द्विवेदी, रविशंकर, शिवप्रकाश, राहुल शेट्टी आणि वीरेन खन्ना या ड्रग पेडलर्सला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. रागिणीने ड्रग्ज चाचणीच्या वेळी मूत्रामध्ये पाणी मिसळून नमुना खराब करण्याचा प्रयत्न केला हाेता. पोलिसांनी तिचा नमुना पुन्हा घेतला.

बातम्या आणखी आहेत...