आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा भाजपाविरोधात ‘बॅनरवार’:स्वतःच ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने राहुल गांधींच्या 41 हजार रुपयांच्या टी-शर्टवर तोंडसुख घेतले होते. त्यानंतर आता काँग्रेस देखील आक्रमक झाले आहे. कल्याणमध्ये भाजपाविरोधात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. स्वतःच ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशा शेलक्या शब्दात काँग्रेसने भाजपवर वार केला आहे. तसेच मोदींचा दहा लाखांचा सुट चालतो, अनुराग ठाकुर यांच्या मुलाचा बर्बेरी टी शर्ट चालतो मग राहुल गांधींचा टी शर्ट डोळ्यात का खूपतो, असे म्हणत काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले.

कल्याणमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवर वाढती महागाई, बेरोजगारी, वाढणारे पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर, महिलांची असुरक्षिता, शेतकऱ्यांची आत्महत्या आणि अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना जनतेची दिशाभूल करणाऱ्या केंद्र सरकाराचा जाहीर निषेध, असे म्हटले आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे शुक्रवारी तामिळनाडूत होते. तिथे त्यांच्या कार्यक्रमापेक्षा त्याचा टी-शर्ट जास्त चर्चत आला. राहुल गांधी यांनी बर्बेरी कंपनीचा पांढरा टी-शर्ट परिधान केला होता. त्यांनी घातलेल्या टी-शर्टच्या किंमतीवरून भाजपने राहुल गांधींवर टीका केली आहे. भाजपाने याबाबत ट्विट केले. त्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी ब्रिटिश लग्जरी कंपनीच्या ब्रँडचा बर्बेरी हा पांढरा टी-शर्ट घातला आहे. त्याची किंमत 41 हजार 257 रुपये असल्याच सांगितले. तसेच, ‘भारत देखो’ असे कॅप्शनही त्यावर लिहले.

काँग्रेसचे सडेतोड उत्तर

भाजपच्या ट्विटला उत्तर देताना काँग्रेसने लिहिले- अरे… तुम्ही घाबरलात का? भारत जोडो यात्रेत जमलेली गर्दी पाहून. या विषयावर बोला... बेरोजगारी आणि महागाईवर बोला. बाकी कपड्यांबद्दल चर्चा करायची झाली तर मोदीजींचा 10 लाखांचा सूट आणि दीड लाखांचा चष्मा यावर चर्चा होईल. सांग काय करायचं ते? असे आव्हान दिले.

बातम्या आणखी आहेत...