आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
१ जानेवारी १८१८ रोजी पेशव्यांच्या सेनेचा निर्णायक पराभव करण्याची मर्दुमकी ८०० सैनिकांनी गाजवली. त्या ऐतिहासिक सत्य घटनेवर ‘द बॅटल आॅफ भीमा कोरेगाव’ हा भव्यदिव्य सामाजिक युद्धपट येत्या सप्टेंबरमध्ये देशभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या पाचशे रुपयांच्या व्हीआयपी पासवर २ कोटी ५ लाखांची सहा बक्षिसे असून समतामूलक समाजासाठी सहभाग नोंदवण्याचे आवाहन ‘रमेश थेटे फिल्म्स’ (आरटीएफ) कडून करण्यात येत आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत अर्जुन रामपाल आणि सनी लिओनी आहेत. सोबत दिग्नाग सूर्यवंशी, अभिमन्यू सिंह, गाेविंद नामदेव, मिलिंद गुणाजी, यतीन कारेकर असे तगडे कलाकारही आहेत. भीमा कोरेगाव चित्रपट निव्वळ कलात्मक नसून भव्यदिव्य ‘सामाजिक युद्धपट’ आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘आरटीएफ’ ही चित्रपट निर्माती कंपनी देशभर व्हीआयपी पासवर मेगा बक्षिसाचे अभियान राबवत आहे.
५०० रुपयांचा व्हीआयपी पास खरेदी केल्यावर प्रदर्शनापूर्वी जवळच्या थिएटरमध्ये चित्रपट पाहता येईल. तिकीट बुक करण्याची गरज नाही. कंपनीकडून फोनवर थिएटर, शोची माहिती कळवण्यात येईल. पास विक्रीसाठी कंपनीने १०० सामाजिक विक्रेते नेमले आहेत. ५०० रुपये देऊन एक पास खरेदी करता येईल. क्यूआर कोड स्कॅन करूनही पास खरेदी करता येतील. देशातील सर्व भाषक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘आरटीएफ’ कंपनी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. त्या जाहिरातीत पास खरेदीचा क्यूआर कोड आहे. जाहिरातीत कंपनीच्या बँक खात्याची माहिती आहे. या खात्यात प्रती पास ५०० रुपये जमा करता येतील. त्यानंतर तुम्ही तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर जाहिरातीत दिलेल्या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर किंवा मेलवर कंपनीला कळवायचा आहे. पास खरेदी करणारे १ कोटी किंवा २१ लाखांच्या एका बक्षिसाचे मानकरी होऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्री, बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार शिदनाक इनामदार असे २१ लाखांचे पाच पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यासोबत एक कोटी रुपयांचा मेगा पुरस्कारही आहे. सहा बक्षिसांची रक्कम २ कोटी ५ लाख आहे. बक्षिसांचे लकी ड्राॅ चित्रपट प्रदर्शनानंतर काढले जातील.
क्यूआरकोड स्कॅन करा, अन्यथा कंपनीच्या बँक खात्यात पैसे भरा किंवा ‘सोशल डिस्ट्रिब्युटर्स’व्दारे रोखीने तुम्ही कितीही व्हीआयपी पास खरेदी करू शकता. एक पास एका बक्षिसास पात्र असेल. माझा चित्रपट तुमचे मनोरंजन करेलच ; पण अस्मितेच्या इतिहासाचे तुम्हाला साक्षीदारही बनवेल. -रमेश थेटे (निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार)
चित्रपट मूळ हिंदीत, सोबत इंग्रजी सबटायटल
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.