आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला आहे. यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्याप्रमाणे विचार करायला लागले आहेत. या पक्षातील भोंदूबाबाच्या ताब्यात कुणी आला तर तो सुटत नाही, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले. शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःकडे लक्ष आकर्षित करणे हे भाजपच्या नेत्यांचे काम झाले असेल, तर याचा अर्थ ते स्वतःच्या कामावर, कार्यावर उभे नाहीत. पवार व ठाकरे महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत. याचे भान त्यांच्यावर चिखलफेक करणाऱ्यांनी ठेवले पाहिजे, असे खा. संजय राऊत म्हणाले.
सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने बेइमानीने सत्ता स्थापन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत गेले. म्हणून उद्धव ठाकरेंचे मन वळले आणि ते पवार साहेबांकडे गेले. भान ठेवून बोला : बावनकुळेंनी केलेल्या टीकेवर संजय राऊत म्हणाले की, बावनकुळे यांनी भान ठेवून बोलले पाहिजे.
पुन्हा शिवशक्ती-भीमशक्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे हे दोघेही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हातात हात घालून काम करत होते. बाबासाहेबांचे हे नाते प्रबोधनकारांच्या नातवांपर्यंत पोहोचलेले आहे. प्रकाश आंबेडकरांविषयी माझ्या मनात सदैव आदर राहिला आहे. आंबेडकर व ठाकरे या ताकदी आहेत. ही ताकद जेव्हा एकत्र येईल, तेव्हा महाराष्ट्राच्या नव्हे, देशाच्या राजकारणाचे चित्र तुम्हाला बदललेले दिसेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.