आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमाई:बीसीसीआय होणार मालामाल, बोर्डाला दरवर्षी होईल 1,887 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीसीसीआयच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सातपट कमी २८३ कोटी मिळतील

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नवे वित्त मॉडेल सादर केले आहे. या मॉडेलमध्ये जगात प्रथमच सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची (बीसीसीआय) कमाई आणखी वाढणार आहे. आयसीसीच्या २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या वित्त मॉडेलनुसार, आयसीसीला दरवर्षी जितकी कमाई होईल त्यातील ३८.५ टक्के वाटा बीसीसीआयला मिळेल.

नव्या वित्तीय माॅडेलमुळे आयसीसीला दरवर्षी जवळपास ४,९२२ कोटी रुपयांहून अधिकची कमाई होईल, असा अंदाज आहे. याच्या ३८.५ टक्के म्हणजे १,८८७ कोटी रुपये बीसीसीआयच्या झोळीत पडतील. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड क्रिकेट बोर्ड आहे. त्यांची वार्षिक कमाई जवळपास ३३९ कोटी रुपये होईल. तिसऱ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाची कमाई जवळपास ३०० कोटी रुपये होईल. बीसीसीआयच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ७ पट कमी म्हणजे जवळपास २८३ कोटी रुपयांचीच कमाई होईल.

तत्पूर्वी, नव्या वित्तीय मॉडेलवर आयसीसीला सर्व क्रिकेट बोर्डाकडून अभिप्राय मागवावे लागतील. त्याची डेडलाइन जूनपर्यंत आहे. जूनमध्येच दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनमधील आयसीसीच्या वार्षिक बैठकीत नव्या वित्त मॉडेलला मंजुरी दिली जाईल. जागतिक स्पर्धांतील कामगिरीच्या आधारावर अायसीसीच्या वित्तीय माॅडेलमध्ये हिस्सेदारी ठरवली जात आहे.