आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल:बीसीसीआयची सावध खेळी; आयपीएलसाठी खास प्राेटाेकाॅल, 19 सप्टेंबरपासून उर्वरित सामने

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार धाेनी मंगळवारी चेन्नईत दाखल झाला. त्याच्या नेतृत्वात चेन्नई संघ १३ आॅगस्ट राेजी युएईला रवाना हाेणार आहे. - Divya Marathi
चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार धाेनी मंगळवारी चेन्नईत दाखल झाला. त्याच्या नेतृत्वात चेन्नई संघ १३ आॅगस्ट राेजी युएईला रवाना हाेणार आहे.

काेराेना महामारीसाठी केलेल्या नियमांकडील दुर्लक्ष भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी चांगलेच महागात पडले. यातून सावरलेल्या बीसीसीआयने आता उर्वरित ३१ सामन्यांच्या आयपीएलमध्ये खेळाडूंसाठी खास प्राेटाेकाॅल तयार केला. याचे पालन करण्याची सर्वांना सक्ती असेल. येत्या १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये यंदाच्या आयपीएलमधील उर्वरित सामन्यांना सुुुरुवात हाेणार आहे. या सामन्यांच्या आयाेजनासाठी बीसीसीआयने खास खबरदारी घेतली. यासाठी बीसीसीआयने आता प्राेटाेकाॅलमध्ये खेळाडूंना मैदानावर एकमेंकाच्या वस्तू वापरता येणार नाही, तसेच टाॅवेलही स्वत:चाच वापरावा लागेल. याशिवाय स्टँडमध्ये गेलेल्या चेंडूचा पुन्हा वापर हाेणार नाही. त्याच्या जागी नव्या चेंडूचा वापर केला जाणार आहे. यासह काही कठाेर असे नियम तयार करण्यात आले. प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार असल्याने हा नियम करावा लागला आहे.

गाेलंदाजांसाठी कडक नियम; लाळेच्या वापरावर पूर्णपणे बंदी
काेराेना महामारीनंतर आता गाेलंदाजांना चेंडूला लाळ लावता येणार नाही. यावर सर्वांची खास नजर असणार आहे. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांदरम्यान हे पूर्णपणे बंद असणार आहे. या नियमाचे पालन करण्याची गाेलंदाजांना सक्ती आहे.

तर....नवीन चेंडूने खेळावे लागणार
आयपीएलच्या यंदाच्या सत्रातील सामन्यादरम्यान फलंदाजांने फटकार मारल्यानंतर मैदानावर बाहेर गेलेल्या चेंडूला सामनाधिकारी सॅनिटाइझ करत हाेते. त्यामुळे त्याचा वापर पुन्हा केला जात असे. मात्र, आता खबदारी म्हणून मैदानावर बाहेर गेलेल्या चेंडूचा पुन्हा वापर हाेणार नाही. त्याच्या जागी नव्या चेंडूची निवड केली जाईल. यूएईमध्ये आयपीएलच्या सामन्यादरम्यान प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश असेल. त्यामुळे या चेंडूच्या माध्यमातून महामारीचा काेणत्याही प्रकारचा संसर्ग हाेऊ नये, यासाठीच बीसीसीआयने हा नियम जाहीर केला.

बातम्या आणखी आहेत...