आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • BDD Chawl Redevelopment Project Program : Chief Minister Uddhav Thackeray's Warning To BJP On The Statement Of Blowing Up Shiv Sena Bhavan

प्रत्युत्तर:अशी झापड देऊ, पुन्हा उठणार नाही, शिवसेना भवन फोडण्याच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीडीडी प्रकल्पाच्या शुभारंभावेळी कानगोष्टी करताना शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे. - Divya Marathi
बीडीडी प्रकल्पाच्या शुभारंभावेळी कानगोष्टी करताना शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे.
  • बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन, 40 मजल्यांच्या 33 इमारती बांधणार

‘थापडा देत शिवसेना इथवर पोहोचली आहे. थप्पड से डर नहीं लगता. त्यामुळे आम्हाला कोणी थापडा मारण्याच्या धमक्या देऊ नयेत. अशी एक झापड देऊ की धमक्या देणारे पुन्हा कधी उठणार नाहीत,’ या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन फोडण्याच्या भाजप आमदाराच्या धमक्यांचा समाचार घेतला.

वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड या वेळी उपस्थित होते. शनिवारी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन तोडफोडीची भाषा वापरल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी कोणाचेही नाव न घेता सणसणीत प्रत्युत्तर दिले. मंत्री सतेज पाटील यांनी आपल्या भाषणात ‘डबल सीट’ चित्रपटाचा उल्लेख केला. तो धागा पकडून, ‘आपलं ट्रिपल सीट सरकार आहे. पण अशा टीकेची आता सवय झाली आहे. थप्पड से डर नहीं लगता... थापडा देत-घेत शिवसेना इथवर आली. त्यामुळे कुणी आम्हाला धमक्या देऊ नयेत,’ असे ठाकरे म्हणाले.

मराठी टक्का ठेवा : शरद पवार
शरद पवार यांनी आपल्या भाषणात बीडीडी चाळीची संस्कृती व इतिहासाच्या आठवणी जागवल्या. इतिहास निर्माण करणारे लोक इथे निर्माण झाले. उद्या इथे ४० मजली इमारती उभ्या राहतील. पण या इमारतींमधून कष्टकरी माणूस जाऊ देऊ नका. इथल्या भागातला मराठी टक्का घालवू नका, अशी विनंती शरद पवारांनी केली.

आशियातील सर्वात मोठा प्रकल्प
मुंबईत नायगाव, वरळी, परळ भागात बीडीडीच्या १९५ चाळी आहेत. वरळीच्या पुनर्विकासात ९ हजार ६८९ घरे उपलब्ध होणार आहेत. पुनर्विकास टाटा कंपनी करणार असून ३६ महिन्यांत ४० मजल्यांच्या ३३ इमारती उभ्या केल्या जाणार आहेत. आशियातला सर्वात मोठा हा प्रकल्प आहे, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.स्वत:हून अंगावर जात नाही, कोणी आला तर सोडत नाही : देवेंद्र फडणवीस
नागपूर | तोडफोड करणे भाजपची संस्कृती नाही. आम्ही कधी तोडफोड करीत नाहीत. आम्ही स्वत:हून कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी अंगावर आला तर त्याला साेडतही नाहीत, अशा कानपिचक्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिल्या. शिवसेना भवनाबाबत आमदार लाड यांच्या वक्तव्याबाबत छेडले असता, त्यांनी तत्काळ एका व्हिडिओद्वारे त्याचे स्पष्टीकरण दिल्याने हा विषय आमच्यापुरता संपला आहे, असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आराखडा, सर्व प्रकारच्या परवानग्या, निविदा काढून कार्यादेश (वर्क ऑर्डर) आमच्या काळात झाले असून भूमिपूजनसुद्धा केले होते. तेच काम दीड वर्षाचा विलंब करून पुन्हा होते आहे, असा दावा फडणवीस यांनी या वेळी केला.

... तरी चाळ संस्कृती टिकवून ठेवा!
माझे दोन्ही आजोबा बीडीडी चाळीत राहत होते, अशी आठवण सांगून तुम्ही टॉवरमध्ये गेलात तरी चाळ संस्कृती टिकवून ठेवा. कोणत्याही मोहात पडू नका. मराठी पाळेमुळे घट्ट रोवून राहा, बीडीडी चाळींनी टॉवरच्या तोडीची उत्तुंग माणसे दिली. त्यामुळे सरकार म्हणून आम्ही कितीही मजली इमारती अन् टॉवर्स बांधले तरी या चाळींच्या ऋणातून मुक्त होता येणार नाही, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच चाळकऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.

बातम्या आणखी आहेत...