आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भाजपचे टीकास्त्र:मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा? शांतता राखा, बदल्या टेंडर वाटप सुरु आहे; मुसळधार पावसानंतर भाजपचा सरकारवर निशाणा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 तासात राज्यभरातील अनेक भागांमध्ये तुफान पावसामुळे अवघा महाराष्ट्र जलमय झाला आहे.

मुंबईत मंगळवारी जोरदार पाऊस झाला. संध्याकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरूच होता. यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहे. तसेच राज्यभरातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावरुन आता भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 'मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ??' असा सवाल भाजप नेते आशिष शेलारांनी विचारला आहे.

24 तासात राज्यभरातील अनेक भागांमध्ये तुफान पावसामुळे अवघा महाराष्ट्र जलमय झाला आहे. मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने मुंबईकरांचे हाल होत आहे. या सर्व परिस्थितीवरुन आता भाजपचे नेते आशिष शेलारांनी राज्य सरकारव निशाणा साधला.

आशिष शेलार यांनी ट्विट केले की, 'विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत. त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे!' अशा शब्दात आशिष शेलार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.