आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश सुर्वे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी:गुजरात, राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रात रात्री 12 वाजेपर्यंत गरबा - दांडियाला परवानगी द्या

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात, राजस्थान व इतर राज्यात जशी नऊ दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत गरबा-दांडीयाला परवानगी दिली जाते, तशीच परवानगी महाराष्ट्रात द्यावी, अशी मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

सुर्वे हे शिंदे गटाचे आमदार असून मुंबईतील गुजराती व्होट बँक खूश करण्यासाठी त्यांनी अशी मागणी केली आहे. अशी चर्चा राजकीय क्षेत्रात आहे.

राज्यात आपले व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले आणि आपण सर्व निर्बंध दूर केल्याने राज्यात तब्बल दोन वर्षांनी दहीहांडी उत्सव व गणेशोत्सव मोठया उत्साहत व जल्लोषात साजरा झाला. 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत यंदा नऊ दिवस मुंबई ठिकठिकाणी नवरात्रौत्सवात गरबा-दांडीयाचे आयोजन होणार आहे. असे आमदार सुर्वे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही नऊ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत गरबा-दांडिया आयोजित करण्यास परवानगी द्यावी.

गरबा क्वीन फाल्गुनी पाठक

मुंबईतील सर्वात मोठी नवरात्री यंदा पश्चिम उपनगरातील बोरिवली येथे होणार आहे. येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सुमारे 13 एकर जागेत गरबा क्वीन फाल्गुनी पाठक यांच्या जीएम नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे दोन लाख स्क्वेअर फुटांचा लाकडी डान्स फ्लोअर बनवला जात आहे. ज्यावर जवळपास 30 ते 35 हजार लोकांना एकाच वेळी गरबा खेळता येणार आहे. रात्री 12 वाजेपर्यंत गरबा-दांडिया आयोजित करण्याच्या परवानगीच्या मागणीला पाठिंबा देत फाल्गुनी पाठक सांगतात की, जवळपास दोन वर्षांनंतर होणाऱ्या गरबा-दांडिया कार्यक्रमाबद्दल त्या खूप उत्सुक आहेत.

बातम्या आणखी आहेत...