आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना महामारी:ऑक्टोबर महिन्यात कोरोनाच्या निर्बंधांसाठी तयार राहा - मुख्यमंत्री; दुसऱ्या लाटेसारखी स्थिती नको म्हणून सूचना

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरणाचा वेग वाढवा

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. दुसऱ्या लाटेसारखी स्थिती होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे तसेच आॅक्टोबर महिन्यात कोरोना निर्बंधांसाठी तयार राहा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्या. आज दुपारी सह्याद्री अतिथिगृहात मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यात राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा आरोग्य विभागाने सादर केला.

निर्बंध हटवल्यामुळे कोरोना रुग्णांची राज्यात संख्या वाढू लागली आहे. सण तोंडावर आहेत. त्यामुळे गर्दी होईल असे कार्यक्रम आयोजित करू नका, मेळावे-सभा असे कार्यक्रम घेऊ नका, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढवण्याकडे लक्ष द्या. आदिवासी जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग कमी आहे. नागरिकांची लस घेण्यासाठी मानसिकता तयार करा. त्यासाठी राजकीय नेतृत्वांनी पुढाकार घ्यावा. आॅक्सिजन निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित करा, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीत दिल्या आहेत.

लसीकरणाचा वेग वाढवा
लसीकरणाचा वेग वाढला आहे. दैनंदिन ८ ते ९ लाख लस दिल्या जात आहेत. राज्याने ५ कोटी ९० लाखांपर्यंत लसीचा टप्पा गाठला आहे. खासगी आस्थापने, उद्योग यांच्याकडे असलेल्या लसी वापरा. त्याची भरपाई लस उपलब्ध होईल तशी करता येईल. यात पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यानी केली.

खबरदारीचा उपाय म्हणून...
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली तसे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. परंतु, गेल्या काही दिवसांत ठराविक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांत पुन्हा वाढ होऊ लागल्याचे निदर्शनास आल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दोन दिवसांपूर्वी निर्बंध काही अंशी कडक करण्याचे संकेत दिले होते. त्याच धर्तीवर बुधवारी मुख्यमंत्र्यांनीही संकेत दिले.

बातम्या आणखी आहेत...