आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Being 72 Years Old I Am At Risk Of Corona Infection, Consider My Request; Anil Deshmukh's Letter To ED Absent From Inquiry; News And Live Updates

माजी गृहमंत्र्यांचे ईडीला पत्र:72 वर्षांचा असल्याने मला कोरोना संक्रमणाचा धोका, माझ्या विनंतीचा विचार करावा; चौकशीस गैरहजर राहणाऱ्या अनिल देशमुखांचे ईडीला पत्र

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • अनिल देशमुख यांनी आपल्या पत्रात काय म्हटले आहे?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज इडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. परंतु, अनिल देशमुख आज पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांनी ईडीला लिह‍िलेल्या पत्रात आपले वाढते वय आण‍ि कोरोनाचा धोका असे कारण सांगत चौकशीतून सूट म‍िळवण्याची मागणी केली आहे. पत्र लिहिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या वकिलांनी ईडी कार्यालय गाठले आहे.

दरम्यान, तीन पानांच्या पत्रात अनिल देशमुख यांनी त्यांच्या विरोधात नोंदवलेल्या ईसीआयआरची प्रतही मागितली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची कोटी वसूलीचे आरोप केले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालय या प्रकरणात "मनी लाँडरिंग" चा गुन्हा दाखल करत संबंध‍ित प्रकरणाची चौकशी करत आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने अन‍िल देशमुख यांना 25 जून आण‍ि 29 जूनला चौकशीसाठी बोलावले होते.

ईडीने देशमुख काही द‍िवसांपूर्वी देशमुख यांच्या मुंबई आण‍ि नागपुरातील काही ठ‍िकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर शुक्रवारी देशमुख यांचे स्वीय सहाय्यक आण‍ि खाजगी सच‍िव दोघांना अटक केली होती. ते दोघेही सध्या ईडीच्या ताब्यात असून 1 जुलैपर्यंत रिमांडवर आहेत.

अनिल देशमुख यांनी आपल्या पत्रात काय म्हटले आहे?

 • आपण पाठवलेल्या 25 जून रोजीच्या समन्सचे मी पूर्णपणे पालन केले आहे आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह माझ्या वक‍िलांना आपल्या कार्यालयात पाठवले आहे. यानंतरदेखील माध्यमांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत.
 • मी एक लोकप्रिय लोकप्रिय नेता आहे आणि माझे संपूर्ण आयुष्य लोकसेवेत घालवले आहे.
 • माझ्यावरचे ज्या व्यक्तीने आरोप केले आहेत. त्यांच्यावर आधीपासून केंद्राच्या इशार्‍यावरुन काम करत असल्याचा गंभीर आरोप आहे.
 • मला स्वतःच या आरोपामागील खोटारडेपणा उघडायचा असून त्यासाठी मला ईसीआयआरची प्रत उपलब्ध करुन द्यावी. कारण योग्य कागदपत्रांशिवाय मला आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास देता येणार नाही.
 • माझे वाढते वयाला कोरोनाचा धोका न‍िर्माण होण्याची शक्यता आहे.

देशमुख यांची अंमलबजावणी संचालनालयाकडे निवेदन

 • अनिल देशमुख यांनी ईसीआयआरची प्रत मागितली आहे.
 • ऑडिओ आणि व्हिडिओ माध्यमातून चौकशी करण्याची विनंती केली जाते.

बातम्या आणखी आहेत...