आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांकडून अजित पवारांचे अभिनंदन:विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा, राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. प्रोटोकॉलनुसार विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अजित पवारांनी राजभवनास सदिच्छा भेट दिली. आपल्या भावी कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्याचे राज्यपालांनी सांगितले. मात्र, या भेटीत राजकीय घडामोडींवरही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील आज अजित पवारांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ हेही उपस्थित होते.

अजितदादा सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतील

अजित पवार यांच्या विधिमंडळातील प्रदीर्घ कारकीर्दीचा अनुभव जनहितासाठी व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच होईल. अजितदादा आपल्या आक्रमक वक्तृत्व शैलीतून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतील व जनतेचे प्रश्न मार्गी लावतील, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. तसेच, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभेत विरोधकांचा आवाज बुलंद करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...