आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सडेतोड:भगतसिंह कोश्यारींची सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर थेट प्रतिक्रिया, म्हणाले - एखादा व्यक्ती राजीनामा घेऊन आला तर...

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकालावर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रोखठोक प्रतिक्रिया देत आपलेच कसे खरे होते, ते पटवून सांगितले आहे. कुणी माझ्याकडे राजीनामा घेऊन आले तर मी त्याला, राजीनामा देऊ नको, असे म्हणणार का? असा सवाल तत्कालीन त्यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.

घटनेच्या नियमांच्या आधारे तेव्हा मी जे काही निर्णय घेतले ते विचारपूर्वक घेतले होते. आता जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे. त्यावर विश्लेषण करणे हे विधीज्ञांचे काम आहे, हे माझे काम नाही, असे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.

अपात्रतेचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आपला निर्णय दिला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. त्यामुळे आता 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय राज्याच्या विधानसभाध्यक्षांना घ्यावा लागेल.

काय म्हणाले कोश्यारी?

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, मी राज्यपालपद सोडून आता तीन महिने झाले आहेत. मी राजकीय बाबींपासून नेहमीच अंतर ठेवून असतो. जो विषय सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी होता, त्यावर त्यांनी निर्णय दिला आहे. अशा बाबींवर कायद्याचे जाणकारच आपले मत व्यक्त करू शकतात. मी कायद्याचा अभ्यासक नाही, मी केवळ संसदीय कार्यशैली जाणतो, त्यामुळे मी यावर बोलणे उचित ठरणार नाही.

मी काय बोलणार?

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, मी त्यावेळी जे निर्णय घेतले ते पूर्णपणे विचार करून घेतले होते. जर एखादा व्यक्ती माझ्याकडे राजीनामा घेऊन आला, तर मी त्याला, राजीनामा देऊ नको, असे म्हणणार का..? सर्वोच्च न्यायालयाने जे काही म्हटले आहे त्यावर विश्लेषण करणे हे तुम्हा लोकांचे काम आहे. मी त्यावर बोलणार नाही.

पवारांची कोश्यारींवर टीका

'राज्यपालाची निवड किती चुकीची केली जाते याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले आहे. मी त्यावर जाहीरपणे आधीच बोललो आहे. त्यांचे नाव महाराष्ट्रातील लोकांच्या लक्षात राहील, '' अशी प्रतिक्रीया देत शरद पवारांनी राज्यपालांची नियुक्ती, राज्यपालांचे वर्तन आणि त्यांची सत्ताधाऱ्यांना असलेली साथ याबद्दल आपली स्पष्ट भूमिका मांडली.