आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील युतीवरून महाविकास आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील मतभेद बुधवारी (ता.११) चव्हाट्यावर आले आहेत. मैत्रीचा हात पुढे करुन राष्ट्रवादी ही काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसण्याचे काम करीत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीला जाब विचारु तसेच आपण पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.
भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडी धर्माला तिलांजली देऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा असलेल्या भंडाऱ्यात कॉंग्रेसने भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाशी युती करून सत्तेचे समीकरण जुळवले. तर गोंदियात राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली. गोंदिया जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे सर्वाधिक सदस्य असूनही कॉंग्रेसला विरोधी बाकांवर बसावे लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.