आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भंडारा रुग्णालयातील घटनेवर आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुःख व्यक्त केले आहे. भंडाऱ्याची घटना अतिशय दुर्दैवी असून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत अशा पद्धतीने कारवाई करण्यात येईल. या घटनेत भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात मोठ्या प्रमाणात काळा धूर निर्माण झाला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल बोलावले. खिडक्या उघडल्या. परंतु, या धुरात गुदमरून 10 बालकांचा मृत्यू झाला. अशी प्राथमिक माहिती मिळाली. या घटनेची सविस्तर चौकशी केली जाईल असे आरोग्य मंत्री म्हणाले आहेत.
सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडीट करण्याचे निर्देश -अजित पवार
भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनीटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.