आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भांडुप पश्चिमेकडील एल.बी.एस. मार्गावरील 'ड्रीम्स मॉल' येथे गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. यामुळे येथे असलेले कोव्हिड रुग्णालयत हे आगीच्या भक्षस्थानी पडले. या दुर्घटनेत अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. तर व्यापाऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहेत. आता यावरुन भाजपकडून राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे. ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे 12 बळी, ठाकरे सरकार हे तुम्हीच करून दाखवले! असे भाजपने म्हटले आहे.
भांडुंपमध्ये आग लागल्यापासूनच भाजपकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या ठिकाणी अग्निप्रतिबंधक अटींची पूर्तता न करताच मॉलमध्ये हे रुग्णालय उभारण्यात आले होते. या दुर्घटनेमुळे रुग्णालय आणि मॉलमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. यावरुन भाजपने राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.
ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे पुन्हा 12 बळी'
'भंडाऱ्यात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याने अवघा महाराष्ट्र हळहळला. पण सरकारी कारभारावर ढिम्म परिणाम झाला. हा प्रकार झाल्यानंतरसुद्धा एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा लागली नाही आणि भांडुपच्या आगीत 12 रुग्ण दगावले... ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं! ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे पुन्हा 12 बळी' असे म्हणत शिवसेनेने निशाणा साधला आहे.
भंडाऱ्यात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला. पण सरकारी कारभारावर ढिम्म परिणाम झाला. हा प्रकार झाल्यानंतरसुद्धा एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा लागली नाही आणि भांडुपच्या आगीत १२ रुग्ण दगावले... ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं! pic.twitter.com/Rt8jl3c9c9
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 27, 2021
का इतका हलगर्जी? का रुग्णांच्या जीवाशी खेळ?'
'भंडारा दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी 156 रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेसाठी 43 कोटींच्या प्रस्तावाचा आदेश दिला होता. मात्र अनेक घोषणांप्रमाणे हा प्रस्तावही दुर्लक्षितच राहिला. आता पुन्हा झालेल्या अग्नितांडवात ठाकरे सरकारच्या हलगर्जीमुळे 12 निष्पाप बळी गेले. सगळे कागदी घोडे, काम कुठेही सुरू नाही. का इतका हलगर्जी? का रुग्णांच्या जीवाशी खेळ?' असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे.
भंडारा दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी १५६ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेसाठी ४३ कोटींच्या प्रस्तावाचा आदेश दिला होता. मात्र अनेक घोषणांप्रमाणे हा प्रस्तावही दुर्लक्षितच राहिला. आता पुन्हा झालेल्या अग्नितांडवात ठाकरे सरकारच्या हलगर्जीमुळे १२ निष्पाप बळी गेले. @OfficeofUT pic.twitter.com/MuR6wwNhio
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 27, 2021
मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही?
अग्निसुरक्षेसाठी 120 दिवसांची मुदत दिली असतानाही 219 खाजगी, 3 सरकारी आणि 28 पालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या नाहीत. पालिकेनेही जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले. मग आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही? असा सवालही भाजपकडून करण्यात आला आहे.
सगळीकडेच रुग्णालयांना आगीचा धोका
'भंडारा ते भांडुप... राज्यात सगळीकडेच रुग्णालयांना आगीचा धोका आहे. फक्त मुंबईपुरता विचार केला, तरी अशा धोकादायक रुग्णालयांची संख्या तब्बल ७६२ आहे... महापालिकेच्याच फायर ऑडिटमधली ही माहिती तुमच्यापर्यंत आली आहे का ठाकरे सरकार...?'
भंडारा ते भांडुप... राज्यात सगळीकडेच रुग्णालयांना आगीचा धोका आहे. फक्त मुंबईपुरता विचार केला, तरी अशा धोकादायक रुग्णालयांची संख्या तब्बल ७६२ आहे... महापालिकेच्याच फायर ऑडिटमधली ही माहिती तुमच्यापर्यंत आली आहे का ठाकरे सरकार...? pic.twitter.com/UGMyRBEnCd
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 27, 2021
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.